Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

निधन वार्ता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निधन वार्ता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २१ डिसेंबर, २०२५

ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब साळुंखे यांचे निधन.

 ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब साळुंखे यांचे निधन. 


वाटंबरे/प्रतिनिधी:

सांगोला (वाटंबरे) ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब  साळुंखे यांचे वयाच्या ( ४५) वर्षी शनिवार दि.२० डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई ,वडील, पत्नी ,मुले ,भाऊ असा मोठा परिवार आहे .त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी सोमवार दि. 22 डिसेंबर रोजी वाटंबरे येथील स्मशानभूमीत सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.


मंगळवार, २ डिसेंबर, २०२५

वाटंबरे येथील सेवानिवृत्त लाईनमन महंमद मुलानी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

वाटंबरे येथील सेवानिवृत्त लाईनमन महंमद मुलानी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.



वाटंबरे /प्रतिनिधी:

सांगोला तालुका वाटंबरे येथील महमुद सुलतान मुलानी यांचे मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते सेवानिवृत्त लाईनमण होते निधना वेळी त्यांचे वय ६९ वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तिनं मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ते जनसामान्यांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या जाण्याने मित्रपरिवार व गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे .त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवार दि. ५ डिसेंबर रोजी वाटंबरे येथील मुस्लिम कब्रस्तान येथे होणार आहे याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.


मंगळवार, १ जुलै, २०२५

वाटंबरे गावचे प्राथमिक शिक्षक संभाजी पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

वाटंबरे गावचे प्राथमिक शिक्षक संभाजी पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

वाटंबरे /प्रतिनिधी:
वाटंबरे गावचे प्राथमिक शिक्षक संभाजी एकनाथ पवार यांचे यांचे मंगळवार दि. १ जुलै रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय _५०__ वर्षे होते.
 कमलापूर येथील आदलिंगे श्रीराम वस्ती या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. .त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई, बहीण असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी गुरुवार दि. ३ जुलै रोजी वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

गुरुवार, २६ जून, २०२५

शिवाजी दत्तू पवार यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.

शिवाजी दत्तू पवार यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.


वाटंबरे गावचे शिवाजी दत्तू पवार यांचे वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने गुरुवार दि२६ जुन रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये शनिवार दि. २८ जून रोजी सकाळी ७ वाजुन ३० मिनिटांनी होणार आहे असी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

बुधवार, २५ जून, २०२५

वाटंबरे गावच्या कै. कमल शंकर पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

वाटंबरे गावच्या कै. कमल शंकर पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.


वाटंबरे गावच्या कै .कमल शंकर पवार यांचे मंगळवार दि. २४ अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय _६५__ वर्षे होते.
दत्तप्रसाद ऑटोमोबाईल चे मालक श्याम पवार यांच्या त्या मातोश्री होत्या
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचा तिसरा दिवसाचा विधी गुरुवार दिनांक 26 जुन रोजी वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

बुधवार, ३० एप्रिल, २०२५

माजी प्राचार्य सुबराव बंडगर यांचे निधन*

*माजी प्राचार्य सुबराव बंडगर यांचे निधन*

नाझरे प्रतिनिधी 
       अनकढाळ ता. सांगोला येथील शेकाप चे ज्येष्ठ नेते, स्वर्गीय आबासाहेबांचे सहकारी, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे मार्गदर्शक, मा. प्राचार्य, मा.जि.प. सदस्य, शेतकरी सहकारी सूतगिरणीचे संचालक, व मानदेश महाविद्यालयाचे उपाध्यक्ष सुबराव रायाप्पा बंडगर यांचे बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता हृदयविकाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्षे 73 होते. 
       त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, एक भाऊ, बहिण, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम शुक्रवार दिनांक 2 मे रोजी सकाळी साडेसात वाजता अनकढाळ ता. सांगोला येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

सोमवार, २८ एप्रिल, २०२५

वाटंबरे येथील सिद्धेश्वर पवार यांचे दुःखद निधन.

वाटंबरे येथील सिद्धेश्वर पवार यांचे दुःखद निधन.
वाटंबरे येथील सिद्धेश्वर ( आप्पा) तुळशीराम पवार यांचे सोमवार दि.२८ एप्रिल रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने वाटंबरे ग्रामस्थ व नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले
यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी दोन भाऊ दोन बहिणी असे कुटुंब आहे. त्यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम बुधवार दि. ३० एप्रिल रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी वाटंबरे स्मशान भूमीत होईल असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५

वझरे येथील मा. तंटामुक्ती अध्यक्ष महादेव पाटील यांचे निधन*

*वझरे येथील मा. तंटामुक्ती अध्यक्ष महादेव पाटील यांचे निधन*

नाझरे प्रतिनिधी 
        वझरे ता. सांगोला येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष व शेकाप चे कट्टर कार्यकर्ते महादेव रामचंद्र पाटील यांचे गुरुवार दिनांक 17 एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. 
      पाटील यांच्या पश्चात आई, तीन भाऊ, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम शनिवार दिनांक 19 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता वझरे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

शनिवार, ५ एप्रिल, २०२५

वाटंबरे येथील आप्पासो पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

वाटंबरे येथील आप्पासो पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

वाटंबरे येथील वारकरी संप्रदायात कार्यरत असणारे आप्पासो आनंद पवार यांचे वयाच्या ८० वर्षी रविवार दि.६ एप्रिल रामनवमी दिवशी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले ते डॉ. उत्तम पवार व बापूसो पवार यांचे वडील होते.त्यांच्या पाठीमागे दोन मुले,दोन मुली,सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी मंगळवार दि.८ एप्रील रोजी सकाळी ७ वाजुन ३० मिनटानी वाटंबरे येथील स्मशानभूमीत होईल अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

वाटंबरे येथील गंगुबाई शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन.

वाटंबरे येथील गंगुबाई शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन.
वाट़ंबरे : प्रतिनिधी 
वाटंबरे  येथील गंगुबाई पांडुरंग शिंदे  यांचे वयाच्या ६५ वर्षी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.रयत शिक्षण संस्थेत न्यु इंग्लिश स्कूल शिरवली येथे प्राचार्य पदावर कार्यरत असणारे नवनाथ शिंदे सर यांच्या त्या मातोश्री व कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला संचालक धनाजी पवार यांच्या आत्या व वाटंबरे विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन गणपत पवार यांच्या त्या बहीण होत्या. त्यांच्या निधनाने वाटंबरे  परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पती,  दोन मुली, मुलगा नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्यावर सोमवार दि. ७ आक्टोंबर  रोजी वाटंबरे येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचा तिसऱ्या दिवसाचा रक्षा विसर्जनाचा विधी  बुधवार दि ९ आक्टोंबर रोजी वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये सकाळी साडे सात   होणार आहे.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

रविवार, ७ एप्रिल, २०२४

माजी प्राचार्य सदाशिव आदट यांचे निधन.

माजी प्राचार्य सदाशिव आदट यांचे निधन.


नाझरे प्रतिनिधी
                 नाझरे ता. सांगोला येथील माजी प्राचार्य सदाशिव रामचंद्र आदट यांचे शनिवार दिनांक सहा एप्रिल रोजी रात्र साडेबारा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्ष 74 होते. 
             त्यांच्या पश्चात पत्नी, चार भाऊ, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता बेलवण नदी माळे वाडी नाझरे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

नाझरे येथील श्रीधर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रुद्रमा वसंतराव पाटील यांचे निधन*

*नाझरे येथील श्रीधर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रुद्रमा वसंतराव पाटील यांचे निधन* 
नाझरे प्रतिनिधी
                   नाझरे तालुका सांगोला येथील श्रीधर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा, सूतगिरणीच्या माजी संचालिका, लोकनेते कै. वसंतराव पाटील यांच्या सुविध पत्नी रुद्रमा वसंतराव पाटील यांचे गुरुवार एक फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मूर्ती प्रसंगी त्यांचे वय वर्षे 74 होते.
                 त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी आमदार कै. डॉक्टर गणपतराव देशमुख सूतगिरणीच्या संचालिका सौ. सीता देवी चौगुले पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

वाटंबरे गावचे दिगांबर पवार यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.

वाटंबरे गावचे दिगांबर पवार यांचे वृद्धापकाळाने  दुःखद  निधन.

वाटंबरे /प्रतिनिधी: वाटंबरे गावचे दिगांबर निवृत्ती पवार यांचे मंगळवारी  दि. ५ सप्टेंबर २०२३  रोजी वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले.  त्यांच्या पश्चात  तिन मुले, दोन मुली ,आठ नातवंडे, सोळा परतुंडे असा मोठा परिवारा आहे . त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये  मंगळवारी दि.  ५ सप्टेंबर २०२३ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधीचा कार्यक्रम दि.७ सप्टेंबर गुरुवारी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी होणार आहे
 अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

शनिवार, १५ जुलै, २०२३

वाटंबरे गावचे वसंत पवार यांचे अल्पशा आजाराने निधन.

वाटंबरे गावचे सांप्रदायिक परिवारातील गोरख पवार यांचे निधन.



वाटंबरे /प्रतिनिधी: वाटंबरे गावचे गोरख तुकाराम पवार यांचे शुक्रवारी दि. १४  जुलै २०२३ रोजी  हृदयविकाराच्या  धक्क्याने   दुःखद निधन झाले. ते वाटंबरे गावातील वारकरी सांप्रदायिक घरातील सदस्य होते  . त्यांच्या पाठीमागेे एक मुलगा, दोन मुली, चौघे  भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये शुुुक्रवारी दि. १४ जुलै २०२३ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधीचा कार्यक्रम दि.१६  जुुलैै  रविवारी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी होणार आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. 

रविवार, २३ एप्रिल, २०२३

वाटंबरे गावच्या आक्काताई पवार यांचे अल्पशा आजाराने निधन.

वाटंबरे गावच्या आक्काताई  पवार यांचे अल्पशा आजाराने  निधन.

वाटंबरे /प्रतिनिधी: वाटंबरे गावच्या आक्काताई  बापु पवार  यांचे शनिवारी दि. २२ एप्रिल २०२३  रोजी अल्पशा आजाराने वाटंबरे येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले. राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे चेअरमन सिद्धनाथ पवार यांच्या त्या बहिणी होत्या. त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये शनिवारी दि. २२ एप्रिल २०२३ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधीचा कार्यक्रम दि.२४ एप्रिल सोमवारी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी होणार आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

सांगोला तालुका वाटंबरे गावचे ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत पवार यांचे अल्पशा आजाराने निधन.

वाटंबरे गावचे  ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत पवार यांचे अल्पशा आजाराने निधन.

वाटंबरे /प्रतिनिधी: वाटंबरे गावचे  ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत शिवाजी पवार यांच आज गुरुवारी दि. २९ डिसेबर २०२२  रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने वाटंबरे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधीचा कार्यक्रम दि.३१ डीसेंबर शनिवारी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी होणार आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

भाजपचे श्रीनिवास क्षीरसागर यांचे अपघाती निधन.

भाजपचे श्रीनिवास क्षीरसागर यांचे अपघाती निधन.
नाझरा गावचे सामाजिक कार्यकर्ते, भाजपचे शक्ती प्रमुख मा. श्रीनिवास क्षीरसागर यांचे सोमवार दि. 19 डिसेंबर 2022 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यांचा स्वभाव अतिशय प्रामाणिक होता. त्यांनी आयुष्यभर खरेपणा कधी सोडला नाही. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण नाझरा व नाझरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली, असा परिवार आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवसाच्या विधीचा कार्यक्रम बुधवार दि. 21 डिसेंबर 2022 रोजी सकाळी ठीक 7.30 वा. आहे

सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

वाटंबरे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण धनवडे यांचे अपघाती निधन.

वाटंबरे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण धनवडे यांचे अपघाती निधन.

वाटंबरे /प्रतिनिधी: वाटंबरे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण सोमा धनवडे याचं आज सोमवार दि. १२ डिसेबर २०२२ रोजी अपघाती निधन झाले.ते सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी असायचे सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असत त्यांच्या जाण्याने वाटंबरे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधीचा कार्यक्रम दि.१४ डीसेंबर बुधवारी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी होणार आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकानी दिली.

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart