प्रेमाविना भक्ती भगवंताला मान्य नसते - कोळेकर महास्वामीजी.
प्रेमाविना भक्ती भगवंताला मान्य नसते - कोळेकर महास्वामीजी.
नाझरे प्रतिनिधी
भक्तीतले सर्व प्रकार केले काय किंवा नाम, जप अखंड केले काय, अभिषेक, ध्यानधारणा, अनुष्ठान इत्यादी अशा अनेक प्रकारे भक्ती केली तरी त्या बाबतीत भगवंताविषयी अंतकरणापासून प्रेम निर्माण झाले नाही तरी ती भक्ती भगवंताला मुळीच मान्य नसते म्हणून आपण भक्ती करताना त्यात प्रेम ओतले पाहिजे व अंतकरणापासून भक्ती केली पाहिजे व ती भगवंतास मान्य होते असे कोळेकर महास्वामीजी यांनी कोळे ते शिखर शिंगणापूर दिंडी सोहळ्यात आशीर्वाचनात सांगितले.
सदर प्रसंगी उत्तराधिकारी कोळेकर महाराज व म्हासोळीकर महाराज यांनीही आशीर्वाचनात विचार मांडले. त्यानंतर दिघंची ता. आटपाडी येथे महास्वामींचे व दिंडी सोहळ्याचे वीरशैव समाजातर्फे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी महास्वामींची पाद्यपूजा वैभव मेनकुदळे व सौ कविता मेनकुदळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी भजन, महाप्रसाद वाटप करण्यात आला. तसेच मठाचे प्रसिद्धी प्रमुख रविराज शेटे यांचाही महास्वामीचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी समाज अध्यक्ष मुन्ना शेटे, माजी अध्यक्ष नानासाहेब मेनकुदळे, मठाचे विश्वस्त गणेश नकाते, धोंडीराम बोधगिरे, तानाजी कुदळे, प्रवीण तोडकर, रविराज स्वामी, योगेश स्वामी, झाडबुके गुरुजी, डोंबे गुरुजी, प्रणवराज शेटे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments