Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

पुरस्कार प्राप्त लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुरस्कार प्राप्त लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

वासुद गांवचे सुपुत्र डॉ.निरंजन आनंदराव केदार यांचा आरोग्य क्षेत्रातील "जीवन- संजीवन पुरस्काराने" सन्मान*

*वासुद गांवचे सुपुत्र डॉ.निरंजन आनंदराव केदार यांचा आरोग्य क्षेत्रातील "जीवन- संजीवन पुरस्काराने" सन्मान*
सांगोला : 
डॉ. निरंजन आनंदराव केदार (एम.डी.मेडिसिन) एक निष्णात डॉक्टर आणि तितकाच संवेदनशील माणूस….लहानपणापासूनच कलेच्या प्रांगणात वावरल्यामुळं अंगी बाणलेली संवेदनशीलता आणि खेळाच्या मैदानातून मिळालेली शिस्त, यांचा उत्कृष्ट संगम म्हणजे डॉ. निरंजन आनंदराव केदार.सांगोला तालुक्यातील क्रांतिकारी गांव म्हणून ओळख असणाऱ्या मु.पो.वासुद-अकोला,गांवचे डॉ.निरंजन केदार सुपुत्र आहेत, सांगोला सारख्या ग्रामीण भागांमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या डॉ. केदार यांचे वडील श्री.आनंदराव गणपती केदार हे रयत शिक्षण संस्थेमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते .श्री.आनंदाराव केदार सरांनी घराच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षणाच्या जोरावर आपल्या कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा या मूल्यांच्या आधारे कर्तृत्वाने गरिबीवर मात करत आपल्या तीनही मुलांनी उच्य विद्याविभूषित केले.डॉ. निरंजन केदार हे त्यांचे द्वितीय नंबरचे चिरंजीव ….कऱ्हाडच्या श्री. सद्गुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्यामंदिर,कराड येथे बालवाडी ते सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पंढरपूरच्या यशवंत विद्यालयात त्यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण अव्वल नंबर मिळवून पूर्ण केलं.

 कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात विज्ञान शाखेतून अत्यंत चांगल्या गुणांची गुणवत्ता मिळवून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. आणि शासकीय महाविद्यालयात वैद्यकीय डॉक्टरकीचे शिक्षण घेण्याचा त्यांचा मार्ग सुखर झाला.बालवाडी पासून ते महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये घेतल्यामुळे कर्मवीर आण्णांच्या जीवनपटाचा आणि प्रेरणादायी विचारांचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडला…आयुष्याच्या जडणघडणीत याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे…पदवीचे उच्य शिक्षण घेण्यासाठी ते सातारच्या आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयात ते डॉक्टरकीचे धडे गिरवण्यासाठी वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी म्हणून दाखल झाले. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी कला, क्रीडा सांस्कृतिक,साहित्यिक,सामाजिक, राजकीय, वैद्यकीय या सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या नेतृत्वसंपन्न कर्तृत्वचा ठसा उमटवण्याचा त्यांनी श्रीगणेशा केला.. डॉक्टरकीची पदवी संपादन करताचं त्यांना साताऱ्यातील डॉक्टरांच्या संघटनेने त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील समाजोपयोगी काम बघून त्यांना आदर्श विद्यार्थी ,आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय ,सातारा हा पुरस्कार बहाल केला. बेळगांवच्या नामांकित के.एल.ई. विद्यापीठातून डॉक्टरकीचे पदव्युत्तर शिक्षण घेताना डॉ.निरंजन केदार यांनी परराज्यात असून देखील आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या जोरावर पुन्हा एकदा के.एल.ई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट पदव्युत्तर विद्यार्थी हा पुरस्कार मिळवला आणि सांगोला तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला…

        आरोग्य ,कला,क्रीडा,सामाजिक क्षेत्रांमध्ये अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांचा गौरव झाला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ते सांगोला तालुक्यात केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून नव्हे तर माणुसकीच्या भावनेनं आणि सामाजिक जाणिवेतून “रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा” मानून ते वैद्यकीय सेवा देत आहेत. अनेकदा मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरं, रक्तदान शिबिरं,विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करून ते समाजाची सेवा करत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीनं आणि उच्च दर्जाचे मोफत वैद्यकीय उपचार शासकीय योजनांच्या माध्यमातून मिळावेत,यासाठी अहोरात्र धडपडणारे डॉक्टर म्हणून त्यांची परिसरात ख्याती आहे.कला,सांस्कृतिक,सामाजिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात देखील कबड्डी, शरीरसौष्ठव अशा खेळांमध्ये अश्वमेध ,आंतरराज्य आणि ऑल इंडिया आंतर विद्यापीठ स्तरावर नेतृत्व करून मैदान गाजवणारे डॉ. निरंजन केदार हे खिळाडूवृत्ती जोपासणारे ते एक यशस्वी खेळाडू तर आहेतच त्यासोबत इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन या शरीरसौष्टव (बॉडीबिल्डिंग) संघटनेचे ते राष्ट्रीय पंच म्हणून देखील काम करतात. अंगी नेतृत्वगुण असल्यामुळं समाजातील विविध वंचित घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न ते करतात. 

*चौकट- "डॉ निरंजन केदार यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आबासाहेबांचा विचाराचा वारसा रुजवण्याचे काम ते अत्यंत संवेदनशीलपणे करत आहेत. सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावून आरोग्य सेवेच्या माध्यमातून काम तर करत आहेतच. परंतु त्यांना सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये निरपेक्षपणे मोलाची मदत करत आहेत. हे विशेष उल्लेखनीय त्यांचे काम विचारात घ्यावेच लागेल. भविष्यात अशी चांगली माणसं समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय होणे ही समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे."*
     अशा समाजभान असणाऱ्या व संशोधकवृत्तीच्या डॉ. निरंजन केदार यांचे अनेक रिसर्च पेपर Pubmed Scopus या सारख्या वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून प्रकाशित झाले आहेत. अशा या हरहुन्नरी कलावंताला आणि नेतृत्वगुणसंपन्न अष्टपैलू डॉक्टर समाजसेवकाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये गोरगरीब गरजू रुग्णांना नव संजीवनी देऊन केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल *जीवन संजीवन पुरस्कार* मिळाल्याबद्दल सामाजिक राजकीय वैद्यकीय अनेक क्षेत्रातील मान्यवराकडून त्यांचे अभिनंदन होत आहे त्यांच्या पुढील वैद्यकीय, सामाजिक, राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

सुनील भिवरे आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

 सुनील भिवरे आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित.



वाटंबरे /प्रतिनिधी:

लक्ष्मी माध्यमिक विद्यालय राजुरी ( सांगोला) या प्रशालेत कार्यरत असणारे शिक्षक सुनील भिवरे यांना सोलापूर जिल्हा शारीरिक व क्रीडा शिक्षक महासंघ सोलापूर यांच्या वतीने आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या गोष्टीचे औचित्य साधत

त्यांचा राजुरी ग्रामस्थ व लक्ष्मी माध्यमिक विद्यालय प्रशालेच्या वतीने शाल, श्रीफळ ,फेटा देऊन सत्कार करण्यात आला.  पुरस्कार प्राप्त सुनील भिवरे यांचे प्रशालेचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व ग्रामस्थांमधून अभिनंदन केले जात आहे.


शनिवार, ३ मे, २०२५

संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 गणेश राऊत यांना प्रधान.

संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 गणेश राऊत यांना प्रधान.

पुणे :प्रतिनिधी/ कांताभाऊ राठोड 
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांच्या सेवेसाठी संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक चळवळीचा मानबिंदू यांच्या वतीने शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 सम्मान निष्ठेचा गौरव कर्तुत्वाचा या सोहळ्यात शिवभक्त साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत ( शिवबांचा छावा) , राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघ चे पदाधिकारी यांना मा. ना. रविकांत तुपकर राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मा.श्री. अभिजीत राणे कामगार नेते व मुंबई मित्र वृत्तपत्र समूह संपादक यांच्या शुभहस्ते शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 देऊन गौरवण्यात आले....

या कार्यक्रमाचे आयोजन संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक डॉ. ज्ञानेश्वर संपतराव सानप व रोशन शंकरराव सानप यांच्या वतीने करण्यात आले होते....

निस्वार्थ कार्याचा कधीच बोलबाला होत नसतो तर त्याची दखल घेतली जाते ती दखल प्रत्येकाच्या कामाची पोहोच असते अशाच कार्याचा आढावा आज आम्हास पाहण्यास मिळाला आणि आज शिवभक्त साहित्यरन डॉ. गणेश विठ्ठल राऊत यांना शिवछत्रपती गौरव पुरस्कार देत असताना आम्हासही गर्व वाटला त्यांचं कार्य पाहून खऱ्या अर्थाने कलयुगात अशाच डाव्यांची गरज आहे तरच छत्रपती शिवरायांचे स्वराज्य अबाधित राखले जाईल असे प्रामाणिक मत राज्यमंत्री रविकांत तुपकर यांनी व्यक्त करत शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 मिळाल्याबद्दल मनस्वी अशा शुभेच्छा दिल्या...

शिवछत्रपती गौरव

या कार्यक्रमाला मा. माणिकराव कोकाटे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य, मा.खा. राजाभाऊ वाजे नाशिक लोकसभा मतदारसंघ, मा. विकास नवाळे उपयुक्त महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर, मा. खा. भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी मतदार संघ, मा. उदय भाऊ सांगळे युवा नेते सिन्नर, मा. उत्कर्षताई रूपवते, व श्री. करण गायकर संस्थापक छावा संघटना सौ. अमिताताई राऊत प्रचिती राऊत प्रशांत महाजन, शिवाजी धावडे, श्रीरंग गायकवाड, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते...

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव गणेश सांगळे यांनी केले.

शनिवार, २६ एप्रिल, २०२५

समर्थ संस्थेचे इंद्रजित पवार यांना सर्वोत्कृष्ठ कुस्ती कार्यवाहक पुरस्कार प्रदान

समर्थ संस्थेचे इंद्रजित पवार यांना सर्वोत्कृष्ठ कुस्ती कार्यवाहक पुरस्कार प्रदान

( पाचुंब्री ता. शिराळा येथील कुस्तीमैदानात वितरण )
सांगोला: समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थेचे उपाध्यक्ष पै.इंद्रजित पवार यांना पाचुंब्री ता. शिराळा येथील कुस्तीमैदानात 'सर्वोत्कृष्ठ कुस्ती कार्यवाहक' पुरस्कार व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.यामध्ये इंद्रजित पवार यांना दिलेल्या सन्मानपत्रात इंद्रजीत पवार यांनी कुस्ती सारख्या मर्दानी खेळाला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यामुळेच महाराष्ट्रातील गावोगावी पैलवानकीच्या शड्डूचा आवाज सर्वत्र घुमतं आहे. गावागावात तालमींची सोय होवून सशक्त निरोगी, निस्वार्थपणे आपला स्वाभीमान जोपसण्याचा प्रयत्न करणारी पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून.आपण आपल्या माध्यमातून तांबड्या मातीचा गौरवशाली इतिहास समाजापुढे सातत्याने विविध माध्यमातून मांडत असल्यानेच या कुस्ती क्षेत्रात आपले आयुष्य वेचणाऱ्या व आपले नशिब आजमावणाऱ्या जुन्या व नविन पिढीला प्रेरणा व उजाळा दिला.आपण फळाची अपेक्षा न करता कुस्ती क्षेत्राबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या कार्याची दखल घेवून सन्मान लाल मातीचा. सन्मान कार्यकर्तुत्वाचा.म्हणून पाचुंब्री येथील श्री जोतिर्लिंग देवाच्या यात्रे निमित्त आयोजित कुस्ती मैदानात उत्कृष्ट कुस्ती कार्यवाहक पुरस्कार आम्ही आपणास बहाल करीत आहोत. या पुढे ही सेवा अखंडीत सुरू राहून नविन पिढीसाठी या लाल मातीच्या सन्मानाचा इतिहास आदर्श ठरावा.असे गौरवोद्दगार काढले.
      यासाठी समर्थ संस्था व न्यूट्रीस्टार हेल्थ प्रोडक्ट प्रा.ली.यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे,सचिव महेशकुमार दत्तू,मेघश्याम सुरवसे, इकबाल पाटील, शरदचंद्र पवार, लता पाटील न्यूट्रीस्टार समूहाचे प्रमुख प्रदीप कुंभार,प्रल्हाद पाटील, जोतिराम सुतार,संदीप कुंभार,देवदास जाधव,भारत वरुटे,कृष्णात डवंग,उत्तम पाटील,विनायक गुरव,संजय गुरव यांचेसह संस्थेचे सभासद व हितचिंतकांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

डॉ. अनिकेत देशमुख यांना मेडिकल क्षेत्रातील इंटरनॅशनल पुरस्कार प्रदान.

सांगोला (प्रतिनिधी):- स्व.भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख यांना वर्ल्ड हेल्थ वेलनेस काँग्रेस या जागतिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा बेस्ट इन्कलास फॉर ऑर्थोपेडिक केअर हा मेडिकल क्षेत्रातील इंटरनॅशनल पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

सदर पुरस्काराचे वितरण मुंबई येथील ताज हॉटेल मध्ये शुक्रवार दि.१६ फेब्रुवारी रोजी मलेशियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ कोहकर चई यांच्या हस्ते उपस्थितीत मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आला.

सामाजिक कार्य तसेच वैद्यकीय क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन २०२४ चा दिला जाणारा मेडिकल क्षेत्रातील इंटरनॅशनल पुरस्कार डॉ. अनिकेत देशमुख यांना मिळालेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. डॉ.अनिकेत देशमुख हे सध्या वैद्यकीय सेवेबरोबरच स्व. भाई. गणपतराव देशमुख यांचा वारसा सक्षमपणे पुढे चालवित आहेत.

सदरचा पुरस्कार हा माझा नसून स्व.आबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेचा आहे. पुरस्कारामुळे अधिक चांगली रुग्णसेवा, समाजसेवा देण्यासाठी ऊर्जा मिळाली - डॉ. अनिकेत देशमुख*
➖➖➖➖➖➖➖➖

मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

सांगोला तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील आधारवड डॉ.अमरसिंह शिवाजीराव शेंडे यांना माणगंगा जीवन गौरव पुरस्कार जाहीर*

*सांगोला तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील आधारवड डॉ.अमरसिंह शिवाजीराव शेंडे यांना माणगंगा जीवन गौरव पुरस्कार जाहीर*

*सांगोला (तालुका प्रतिनिधी): अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या माणगंगा परिवार अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी सांगोला यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार व माणगंगा गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व सांगोला तालुक्यातील पहिले एम.एस. सर्जन डॉ. अमरसिंह शिवाजीराव शेंडे यांना माणगंगा परिवाराचा पहिला माणगंगा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.*
                  *२६ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता एमबीएम मॉल, सांगोला येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमास डॉ.डी. वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी. पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.*
                    *सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला पहिला अतिदक्षता विभाग, पहिलं सीटी स्कॅन सेंटर, पहिलं सोनोग्राफी सेंटर, पहिलं डायलिसिस युनिट, पहिलं सुसज्ज ऑपरेशन थिएटर डॉ.अमर शेंडे सर यांच्या आनंद हॉस्पिटलमध्येच कार्यरत झालं.आनंद हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातलं ते पहिलं आयएसओ मानांकन प्राप्त हॉस्पिटल आहे.* 
                     *डॉक्टर अमरसिंह शिवाजीराव शेंडे हे आजमितीस सांगोला पंचक्रोशीतील सर्जरी क्षेत्रातील भीष्म पितामह म्हणून ओळखले जातात. कोणत्याही ज्युनिअर सर्जनला आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यास ते नेहमी तत्पर असतात. आपत्कालीन परिस्थितीत कौशल्यानं सर्जरी करून हजारो रुग्णांना जीवनदान देणारे देवतुल्य डॉक्टर म्ह्णून डॉ.अमर शेंडे यांची वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आहे.तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, कृषि , वैद्यकीय अशा सर्व क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांचा आधारवड, असा त्यांचा लौकिक आहे. तरी या कार्यक्रमास सांगोला तालुका व पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे माणगंगा परिवाराच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.*

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

युवा उद्योजक सुरेश पवार यांना कोल्हापूर येथे 'महात्मा फुले कृषिरत्न' पुरस्कार प्राप्त.

युवा उद्योजक सुरेश पवार यांना कोल्हापूर येथे 'महात्मा फुले कृषिरत्न' पुरस्कार प्राप्त.

वाटंबरे /प्रतिनिधी:
कोल्हापूर येथील संविधान विचार मंच कोल्हापूर आणि लोकहिरा न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन तसेच संविधान दिना निमित्त सेंद्रिय शेती, गांडूळ खत निर्मिती आणि कृषी क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल वाटंबरे गावचे युवा उद्योजक यशराज गांडूळखत प्रकल्पाचे संचालक श्री सुरेश वसंत पवार यांना महात्मा फुले कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार त्यांना अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता सर्जेराव गायकवाड, डॉ. प्रवीण कोडोलीकर, हनुमंतराव सोनवणे, विचारवंत प्रसाद कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.
                       संविधान दिनानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सुरेश पवार यांनी सुरू केलेल्या यशराज गांडूळ प्रकल्पात तयार होणारे दर्जेदार गांडूळ व वर्मी वॉश याच्या दर्जा विषयी माहिती व खात्री महाराष्ट्रभर पसरली आहे. पाच गांडूळ बेड पासून सुरू झाला हा प्रवास शंभर गांडूळ बेडच्या पर्यंत पोहोचत आला आहे. विविध फळपिके व पालेभाजीपिके पीकवणाऱ्या शेतकऱ्यांकडून यशराज खतास मागणी असते.
                        यापूर्वीही त्यांना महाराष्ट्र राज्य आदर्श उद्योजक, स्वर्गीय वसंतराव नाईक कृषि प्रेरणा पुरस्कार नाशिक आणि इन्स्पायर अवॉर्ड नाशिक यांसारख्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महात्मा फुले कृषीरत्न पुरस्काराने त्यांच्या सन्मानात आणखीन भर टाकली आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल वाटंबरे गाव आणि पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

बुधवार, १२ एप्रिल, २०२३

अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प.प्रा.शाळा शिंदेवस्ती चे {वाटंबरे}सुयश.

अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प.प्रा.शाळा शिंदेवस्ती चे {वाटंबरे}सुयश.

वाटंबरे/प्रतिनिधी: सांगोला तालुका वाटंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे वस्ती येथील  स्वरा श्रीधर पवार व प्रणाली संतोष पवार या दोन विद्यार्थिनींनी  अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश प्राप्त केले.
 स्वरा श्रीधर पवार  हिने अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा सातारा (IAS) या स्पर्धा परिक्षेत राज्याच्या यादीत पाचवा, जिल्ह्यात तिसरा व सांगोला तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे , तिने १५० पैकी १४२ गुण  प्राप्त केले आहेत.तसेच प्रणाली संतोष पवार हीने  परिक्षेत  १५० पैकी १३२ गुण मिळवून सांगोला तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला.
एकाच शाळेतील दोन विद्यार्थिनीने येवढ्या मोठ्या प्रमाणात यश प्राप्त केल्यामुळे शाळेतील शिक्षक , विद्यार्थि व पालकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

शनिवार, १० डिसेंबर, २०२२

निर्भीड पत्रकार चाँदभैय्या शेख यांची पुरस्कारांची नव्वदीपार ; राज्यस्तरीय युवा आयकॉन पत्रकाररत्न पुरस्कार जाहीर*

*निर्भीड पत्रकार चाँदभैय्या शेख यांची पुरस्कारांची नव्वदीपार ; राज्यस्तरीय युवा आयकॉन पत्रकाररत्न पुरस्कार जाहीर*

            {सोलापूर जिल्हाच्या शिर पेचात अजून एक मानाचा तुरा }

लहानपणापासून समाजाची सेवा करण्याची आवड व आपल्या धारदार लेखनीने व पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य, तळागाळातील गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे कमी कालावधीतच गरुडझेप घेणाऱ्या सीबीएस न्युज नेटवर्क चे संपादक व निर्भीड पत्रकार चाँद भैया शेख यांची आता पत्रकारिता क्षेत्रात अजून एक गरुड भरारी घेतली आहे.*भैय्यासाहेबांनी पुरस्काराची नव्वदी पार केली आहे* भैय्यांना युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे दिला जाणारा *राज्यस्तरीय युवा आयकॉन पत्रकार रत्नपुरस्कार जाहीर करण्यात आला आहे* श्री. चांदभैया शेख यांनी २००७ सालीपासून पत्रकारिता आणि समाजसेवा करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईनच्या स्वरूपात त्यांनी सुमारे १३०० महाराष्ट्रातील लोकांना कोविंड योद्धा या पुरस्काराने सन्मानित केले. तसेच सीबीएस न्युज मराठी च्या माध्यमातून आतापर्यंत तिन्ही वर्धापन सोहळ्यात सुमारे १७० विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे .विशेषतः गेला पंधरा वर्षात सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य पत्रकारिताच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न निर्भीडपणे शासनापर्यंत मांडले आहेत तसेच त्यांना आतापर्यंत विविध संस्थेच्या माध्यमातून ८९ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे त्याची युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे दिला जाणान्या युवा आयकॉन पत्रकार रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.हा त्याना मिळणार ९० वा पुरस्कार आहे .भैय्या हे चळवळीतील कार्यकर्ते, निर्भीड, पत्रकार, मनमिळाऊ स्वभावचे असल्याने त्यांचा दांडगा जण संपर्क आहे. तसेच कामगार कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांना एकजूट करून सतत काम करीत आले आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य भेडसावणाऱ्या समस्या जनसामान्यांचे न्यायीक विषय सरकार दरबारी मांडणे हे त्यांचे कार्य पाहून जणता सलामी ठोकत आहे विशेषतः राज्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा विषयांचे बातमीपत्र गाजले आहेत. ते सीबीएस न्युज मराठी चे मुख्य संपादक आहेत. आणि त्यांच्या निर्भीड बातम्यांची दखल शासन दरबारी कायम घेतली जात आहे.जनसामान्यांना भेडसावणारे प्रश्न सातत्याने सीबीएस न्युज मराठी च्या माध्यमातून मांडतात, वंचितांचे सोक्षितांचे, पीडितांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांना जाब विचारण्याचे काम चाँदभैय्या आजही धडाडीन करत आहेत. ज्यांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहचू शकत नाही अशा अनेकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम गेली अनेक वर्ष निर्भीडपणे करत असल्यानं त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात शुभेच्छा वर्षाव व जल्लोष करण्यात येत आहे.

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart