Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

एसटीने पाठीमागून धडक दिल्याने अनकढाळ येथील बाबासाहेब बंडगर यांचा जागीच मृत्यू.

एसटीने पाठीमागून  धडक दिल्याने अनकढाळ येथील बाबासाहेब बंडगर यांचा जागीच मृत्यू.



सांगोला- भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने पाठीमागून स्कुटीला जोराची धडक दिल्याने अपघातात गंभीर जखमी झालेल्या ५४ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.हा अपघात काल मंगळवारी दुपारी २:१५ च्या सुमारास सांगोला- मिरज हायवे वरील कमलापूर (अनुसे मळा ) या ठिकाणी घडला. बाबासाहेब कृष्णा बंडगर -५४ रा.अनकढाळ ता. सांगोला असे मृताचे नाव आहे. याबाबत, दत्तात्रय सत्यवान बंडगर रा.सदर यांनी फिर्याद दिली पोलिसांनी एसटी चालक संतोष दिनकर खोपकर रा. धबधबेवाडी ता. पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला. 


 अनकढाळ ता सांगोला येथील मृत बाबासाहेब बंडगर हे मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास त्यांच्या एम एच-०३ एव्ही- ३६५३ या स्कुटी वरून सांगोला ते मिरज हायवेने अनकढाळ घराकडे निघाले होते त्यादरम्यान सांगोला येथून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एम एच १४-एम एच -१३५७ एसटी बसने कमलापूर (अनुसे मळा ) कॉर्नरला पुढील सदर स्कुटीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातात स्कुटीवरील बाबासाहेब बंडगर हे उडून रोडच्या कडेला असलेल्या लोखंडी कठड्यावर जाऊन पडल्याने गंभीर जखमी झाले त्यादरम्यान नेमके पाठीमागून दत्तात्रय बंडगर व बापूराव सुरवसे असे दोघेजण मिळून एम एच १०-ईबी-३०३३ या स्कार्पिओ मधून अनकढाळ गावाकडे जात असताना त्यांनी अपघात झाल्याचे पाहून त्यांची कार थांबवली. अपघातातील जखमी ओळखीचे बाबासाहेब बंडगर असल्याने त्यांना उपचार करता त्याच स्कार्पिओ मधून सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले.

No comments