Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

माजी प्राचार्य सुबराव बंडगर यांचे निधन*

*माजी प्राचार्य सुबराव बंडगर यांचे निधन*

नाझरे प्रतिनिधी 
       अनकढाळ ता. सांगोला येथील शेकाप चे ज्येष्ठ नेते, स्वर्गीय आबासाहेबांचे सहकारी, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे मार्गदर्शक, मा. प्राचार्य, मा.जि.प. सदस्य, शेतकरी सहकारी सूतगिरणीचे संचालक, व मानदेश महाविद्यालयाचे उपाध्यक्ष सुबराव रायाप्पा बंडगर यांचे बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता हृदयविकाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्षे 73 होते. 
       त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, एक भाऊ, बहिण, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम शुक्रवार दिनांक 2 मे रोजी सकाळी साडेसात वाजता अनकढाळ ता. सांगोला येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

No comments