Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

पदाधिकारी मेळावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पदाधिकारी मेळावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २७ मे, २०२५

कोल्हापुरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा*

*कोल्हापुरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा*

*रुग्णालये व रुग्णसेवकांचा सन्मान सोहळा*

*साहस संभाषण*

*पुसेसावळी : उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व खा. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी मेळावा व वैद्यकीय सन्मान सोहळा ता.३० मे रोजी दु.२ वा. लोटस हॉल, रेल्वे सिमेंट गुडस शेजारी मार्केट यार्ड कोल्हापुर या ठिकाणी आयोजित केला असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरज जम्मा व पंढरपूर विभागाचे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख सतीश सावंत यांनी दिली.*

*शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकारी मेळावा व वैद्यकीय सन्मान सोहळा प.पु. काडसिध्देश्वर स्वामीजी मठाधिपती श्री. सिध्दगिरी संस्थान मठ, आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबीटकर, उद्योगमंत्री ना. उदय सामंत, उच्च्य शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, महाराष्ट्र नियोजन मंडळ अध्यक्ष ना.राजेश क्षीरसागर, हभप राणा महाराज वासकर अध्यक्ष वारकरी पाईक संघ पंढरपुर यांसह खा. धनंजय महाडीक, माजी खा. संजय मंडलिक, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. विनय कोरे, आ. शिवाजी पाटील,*

*आ.चंद्रदीप नरके, आ.अमल महाडीक, आ. राहुल आवाडे, आ. अशोक माने, आ. सुहास बाबर, आ. महेश शिंदे, आ. विजय शिवतारे, माजी आ. सुजीत मिणचेकर, माजी आ. शहाजीबापु पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असुन दुपारी पहिल्या सत्रात दु.३ वा.डॉ. शार्दुल भणगे यांचे अवयवदान चळवळ जनजागृती, दु. ३.३० वा. जगदीश ओहोळ यांचे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा, सायं. ४वा. जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे ६५ वर्षांचा महाराष्ट्र व पुढील आव्हाने तर द्वितीय सत्रात सायं. ५वा. ज्योती वाघमारे यांचे काश्मीर ते कन्याकुमारी मदतीचा हात एकनाथ, सायं. ५.३० वा. खा. धैर्यशिल माने यांचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष विस्तार वाढीसाठी रुग्णसेवकांचे कर्तव्य जबाबदारी या विषयावर व्याख्यान होणार असुन सायं. ६ वा. रुग्ण केंद्रबिंदू मानुन संवेदनशिलता जपत रुग्णसेवा करणार्या पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णालयांचा व रुग्णसेवकांचा वैद्यकीय सेवा सन्मान करण्यात येणार आहे. तरी कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकारी यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्याध्यक्ष रामहरी राऊत व पश्चिम महाराष्ट्र सचिव गौरव गुळवणी यांनी केले आहे.*
  *सदरील कार्यक्रमास सोलापुरातून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सोलापूर जिल्हाप्रमुख मनीषा ताई वासकर,प्रशांत वायकस्कर,डॉक्टर सेल प्रमुख डॉ.शशिकला जगताप,धाराशिव संपर्क प्रमुख सचिन मांजरे-पाटील,उपजिल्हाप्रमुख रोहन बलाक्षे,विजय माने,पंढरपूर विभाग प्रमुख सतीश सावंत, माढा तालुका प्रमुख सागर कोले,करमाळा ता.प्रमुख दीपक पाटणे व गणेश चव्हाण,,माळशिरस ता.प्रमुख बापूराव क्षीरसागर,सोलापूर शहर प्रमुख गफुर शेख व श्रीकांत गट्टू यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय मदत कक्षाच्या सर्व प्रमुखांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart