Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

स्नेह मेळावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्नेह मेळावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ११ जून, २०२५

नाझरे येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा* *स्नेह मेळावा संपन्न...*

*नाझरे येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा*    
 *स्नेह मेळावा संपन्न...* 
नाझरे प्रतिनिधी
        नाझरे व कोळाबीट मधील सेवानिवृत्त शिक्षकांचा स्नेह मेळावा सांगोला तालुका पेन्शन संघटनेच्या वतीने नाजरे येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र केंगार हे होते. सुरुवातीस नंदकुमार केंगार, राम केंगार यांनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना सादर केली व सावित्रीबाई फुले, साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
        सुरुवातीस पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा सांगितला तर पेन्शनर कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे संघटनेचे सल्लागार शंकर सावंत यांनी यावेळी सांगितले. संघटनेचे सभासद वाढविण्याचे आवाहन उपाध्यक्ष जयवंतराव नागणे यांनी केले. तर कविवर्य शिवाजीराव बंडगर यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट कवितेतून कथन केला. प्रकृती स्वास्थ्यासाठी प्राणायाम गरजेचे आहे असे माजी केंद्रप्रमुख शिवाजीराव करांडे यांनी सांगितले, तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी घरी सर्वांना गोड बोलून राहण्याचे आवाहन संघटनेचे सल्लागार प्रभाकर कसबे यांनी केले. यावेळी संघटनेचे शेलार मामा सदाशिव साबळे गुरुजी यांनी दीर्घायुष्याचे रहस्य उलगडून सांगितले. प्रत्येक माणसाला वेळ देऊन संवाद साधा असे आवाहन महादेव जाधव गुरुजी यांनी केले. तर तणाव मुक्त राहून आयुष्य कारणीमुक्त करा असे जालिंदर केंगार गुरुजी यांनी सांगितले. सेवा काळातील अनुभव व यापुढे आम्ही सेवानिवृत्त सर्व शिक्षक संघटनेत मनापासून सामील होत असल्याचे राजाराम बनसोडे गुरुजी यांनी सांगितले. सकाळी चहा बिस्कीट घेऊ नका त्याऐवजी सकस आहार घ्या व मूळव्याध यावर आपण मोफत औषध देतो असे ज्ञानेश्वर मिसाळ गुरुजी यांनी सांगितले. 
        सेवानिवृत्त शिक्षक सय्यद अहमद काजी, राजाराम बनसोडे, दीपक शिरदाळे, रामचंद्र तेली, मोहन केंगार, दत्तात्रेय शास्त्री, दगडू चौगुले, शिवाजीराव बंडगर, रविराज शेटे,, श्रीमती सुमन सरगर, हजरत शफि उल्ला काजी, विश्वंभर मिसाळ इ. सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे गंगाधर इमडे, अरुण वाघमोडे, दिनकर घोडके, अभिमन्यू कांबळे, श्रीमती सुनंदा चव्हाण, एकनाथ जावीर, मच्छिंद्र भोसले, भारत वाघमारे, जालिंदर मिसाळ, धोंडीराम बनसोडे, मच्छिंद्र भोसले, सर्व संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन एकनाथ जावीर व आभार सिद्धेश्वर झाडबुके यांनी मानले.

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart