वाटंबरे /प्रतिनिधी : नाझरे दूर क्षेत्रात अलीकडील काही दिवसांपासून शेळ्यांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाटंबरे येथे सोमवार दि. 29 डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी वाटंबरे सर्विस रोड लगत असणाऱ्या बाळासाहेब धनवडे, सुरेश बोरगे, निलावती भगत यांच्या घरी रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांकडून शेळ्या चोरण्याचा प्रकार घडला. सर्व पशुपालकांच्या सहा शेळ्या चोरीस गेल्याची घटना घडली याची माहिती सरपंच नामदेव पवार यांना माहीत झाल्यावर त्यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून गावातील नागरिकांना त्यांनी सावध केले. पाठीमागच्या महिन्यातच अनकढाळ येथे रोड लगत असणाऱ्या बंडगर पाटी येथे शेळ्यांची चोरीची घटना ताजी असतानाच वाटंबरे येथेही सर्विस रोड लगत असणाऱ्या घरातून चोरीचे प्रमाण वाढत असल्याने रोड लगत असणाऱ्या पशुपालकातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
गावातील पशुपालकांचा शेळीपालन हा मुख्य उपजीविकेचा स्रोत असल्याने चोरीच्या या घटनांमुळे त्यांना मोठा फटका बसत आहे.
वाटंबरे नागरिकातुन सर्विस रोड लगत उड्डाणपुलाखाली सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची व पोलीस प्रशासनाने रात्रीची ग्रस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.

Social Media Icons