Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

वाटंबरे येथील अर्णव पवार चे परिणती या चित्रपटातून आगमण.

 वाटंबरे येथील अर्णव पवार चे परिणती या चित्रपटातून आगमण.



(अर्णवच्या रूपाने वाटंबरे गावाचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार)

 

वाटंबरे /प्रतिनिधी:

सांगोला  तालुका वाटंबरे येथील मुंबई येथे रविकिरण विद्यालय विक्रोळी या माध्यमिक विद्यालयात शिक्षक पदावर कार्यरत असणारे भाऊसाहेब पवार यांचा मुलगा अर्णव पवार याची परिणीती या चित्रपटातून आगमन होणार आहे .

लहानपणापासून अभिनयाची आवड असणारा  अर्णव हा  मुंबई येथे घाटकोपर  या ठिकाणी एस,आय,ई,एस  या शाळेत शिक्षण घेत आहे. 

लहानपणापासून अभिनयाची आवड असणाऱ्या अर्णव ने एका मराठी चित्रपटात गायन केले आहे तसेच बांधकाम कामगार महाराष्ट्र शासन जिंगल साठी गित गायण केले आहे तसेच स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई या शॉर्ट फिल्म  बरोबर  बॅक अॉफ महाराष्ट्र साठी जाहीरात केली आहे.

लेखक दिग्दर्शक अक्षय बाळसराफ,प्रोड्युसर पराग मेहता व हर्ष नरुला यांचा १ अॉगस्ट २०२५ रोजी परिणती हा चित्रपट सर्व चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी,अक्षर. कोठारी यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या या चित्रपटात अर्णव ने अमृता सुभाष व अक्षर कोठारी यांच्या मुलाची भुमिका स्विकारली आहे.

 सांगोला तालुका हा महाराष्ट्रात दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो या दुष्काळी भागातून अर्णव सारखे कलाकार आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत अर्णव सारख्या या बालकलाकारामुळे ग्रामीण भागातील कलाकारांना एक नवी उमेद मिळणार आहे, शहरी भागातील कलाकाराबरोबर ग्रामीण भागातील  कलाकार आपलाऊ अभिनयाव्दारे चुणूक दाखवून देणार आहेत .

वाटंबरे तसे सांगोला तालुक्यामधून मोठ्या प्रमाणावर अर्णवचे अभिनंदन केले जात आहे तसेच या चित्रपटाची सांगोला तालुक्यातील नागरिक

 आतुरतेने वाट पाहत आहेत .



No comments