Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

निवड संपन्न लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निवड संपन्न लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या कार्याध्यक्षप

*सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या कार्याध्यक्षपदी रविराज शेटे यांची निवड...* 

सांगोला प्रतिनिधी 
       सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर येथे राज्याचे मा. कोषाध्यक्ष गोरख भाऊ भिलारे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य कार्यकारणी सदस्य अंबादास शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यामध्ये संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी शिवलिंग आप्पा मेढेगार यांची तर कार्याध्यक्षपदी रविराज शेटे व सचिव पदी सचिन उर्फ बंटी बाबर यांची एकमताने निवड करण्यात आली. 
     संघटनेचे आतापर्यंतचे कामकाज व रोपरेषा याबद्दल गोरख बिलारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोषाध्यक्ष आनंद तेंडुलकर, सहसचिव मल्लिकार्जुन कोरे, सदस्य पदी विजय भगरे, सुरेंद्र स्वामी, सुनील कोरे, प्रवीण गायकवाड, सनातन कुमार बंडी, दत्तात्रेय तात्या सपकाळ यांची व सल्लागारपदी महेश पटवर्धन, महावीर विद्या गज यांची ही निवड करण्यात आली. एकी हेच बळ आहे व यापुढे संघटनेच्या कामासाठी सर्वांनी सहकार्य करावे व आमचेही सहकार्य राहील असे नूतन कार्याध्यक्ष रविराज शेटे व अध्यक्ष शिवलिंग आप्पा मेढेगार यांनी निवडीनंतर मत व्यक्त केले. यावेळी वृत्तपत्र विक्रेते अशोक खरात, शशिकांत पाठक व इतर विकृती उपस्थित होते. एवढी नंतर सर्वांचा सत्कार करण्यात आला. शेवटी सर्वांचे आभार सचिव बंटी बाबर यांनी मानले.

सोमवार, १४ जुलै, २०२५

शासनाच्या आदिशक्ती अभियान समितीच्या अध्यक्षपदी बुद्धेहाळ गावच्या रूपाली काळे यांची निवड

शासनाच्या आदिशक्ती अभियान समितीच्या अध्यक्षपदी बुद्धेहाळ गावच्या रूपाली काळे यांची निवड.

सांगोला/प्रतिनिधीः
महिलांच्या समक्षीकरणासाठी शासनाने स्थापन केलेल्या आदिशक्ती अभियान समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या रूपाली संतोष काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  
राज्यातील महिला व बालकांची मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंख्या व राज्यातील महिलांच्या जीवनात येणार्‍या समस्या व त्यांच्या सबलीकरणासंदर्भात भेडसावणार्‍या समस्या ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या अर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीने सन 2025-26 पासून राज्यात आदिशक्ती अभियान राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे महिलांसाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजना/उपक्रम/कार्यक्रम इ. बाबत आवश्यक व उपयुक्त माध्यमाद्वारे प्रचार प्रसिध्दी देऊन जनमाणसांमध्ये याबाबतची जनजागृती करण्यात येईल. यासाठी ग्रामस्तरीय समित्यांना आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे .
ग्राम चळवळीतून महिलांच्या समस्यांचे महत्व जाणून घेणे व महिलांच्या आरोग्य समस्यांचे संवेदनशीलपणे निवारण करणे., कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरीता सक्षम समाज निर्माण करणे., लिंगभेदात्मक विचारसरणीला आव्हान देऊन किशोवयीन मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे व बालविवाह मुक्त समाज निर्माण करणे., ही लैंगिक, शारीरिक अत्याचार ला प्रतिबंध करून हिंसाचार मुक्त कुटुंब व समाज निर्माण करणे व अनिष्ट रुर्डीचे निर्मुलन करणे., महिला नेत्तृत्वाला सक्षम करून पंचायत राज पद्धतीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे., महिला, किशोरी यांना शिक्षण, रोजगार, निर्णय व हक्क यामध्ये समान संधी निर्माण करून शासकीय योजनांचा लाभ व स्वयंरोजगाराच्या संधींच्याचीयमातून आर्थिक उन्नत श्री संकल्पना राबविणे हे या समितीचे काम आहे.
ग्राम सभेने निवडलेली महिला प्रतिनिधी- अध्यक्ष, पुरुष प्रतिनिधी (महिला व बाल विकास क्षेत्रात सक्रिय)- सदस्य,  पुरुष प्रतिनिधी सामाजिक क्षेत्रात सक्रिया- सदस्य, आशा स्वयंसेविका-  सदस्य, महिला शिक्षिका / महिला तलाठी/महिला पोलीस पाटील- सदस्य, ग्रामसेवकों ग्राम विकास अधिकारी- सदस्य,  पोलीस पाटील-सदस्य,   अंगणवाडी सेविका-सदस्य सचिव यांचा या समितीत समावेश आहे.
रूपाली काळे यांनी  बुद्धेहाळ गटात दारूबंदी,  महिलांच्या अडीअडचणी सोडवून महिलांचे संघटन करून महिला सक्षमीकरण करण्यासाठी सिंहाचा वाटा आहे. यांच्या निवडीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

वृत्तपत्र विक्रेता संघटनेची कार्यकारणी निवड*

*वृत्तपत्र विक्रेता संघटनेची कार्यकारणी निवड*
सांगोला प्रतिनिधी
             सोलापूर वृत्तपत्र विक्रेता संघटना दत्त चौक सेंटर येथील वृत्तपत्र विक्रेत्यांची बुधवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी 
श्रीराम मंदिर येथे बैठक आयोजित केली होती .
या बैठकीमध्ये संघटनेच्या अध्यक्षपदी सनद बंडी, उपाध्यक्षपदी राजेश श्रीमल तर सचिवपदी प्रकाश मठ यांची
सर्वानुमते निवड करण्यात आली .
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शिवलिंगआप्पा मेढेगार हे होते ,तर प्रमुख उपस्थिती बार्शी संघटनेचे अध्यक्ष सचिन बाबर 
तसेच महाराष्ट्र राज्य संघटनेचे कार्यकारणी संघटनेचे सदस्य , पंढरपूरचे गोरख भिलारे हे उपस्थित होते. 
या बैठकीमध्ये निवड झालेल्या पदाधिकाचा सन्मान शाल, हार पुष्पगुच्छ देऊन
 प्रमुख उपस्थितीच्या हस्ते करण्यात आला.
या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी 
सांगितले की या पुढील काळामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेता संघटना, सोलापूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना ,आसरा सेंटर तसेच दत्त सेंटर हे विक्रेत्यांच्या हितासाठी एकत्र येऊन काम करतील अशा स्वरूपाची ग्वाही दिली.
या बैठकीला आसरा सेंटरचे पदाधिकारी व दत्त सेंटरचे अनेक वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.

गुरुवार, २ मार्च, २०२३

राज्य दैनिक वृत्तपत्र बाळकडूच्या पुणे जिल्हाप्रमुख पदी कांता( भाऊ) राठोड यांची निवड.

राज्य दैनिक वृत्तपत्र बाळकडूच्या पुणे जिल्हाप्रमुख पदी कांता( भाऊ) राठोड यांची निवड.
वाटंबरे/प्रतिनिधी:दि. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी बाळकडू दैनिक वृत्तपत्राचे संपादक दीपक खरात गुरुजी यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरातून जिल्हाप्रमुख , उपजिल्हाप्रमुख, व विधानसभा प्रमुख पदाची नियुक्ती जाहीर केली यामध्ये पुणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी कांता (भाऊ) राठोड यांना देण्यात आली.
कांता (भाऊ) राठोड हे सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे ते बाळकडू वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत होते त्यांची जिद्द, चिकाटी, बाळकडू वृत्तपत्रा विषयी त्यांचे प्रेम, व आपलेपणा, जिव्हाळा, व कामातील कायम सातत्यपणा या सर्व गोष्टींचा विचार करून  पुणे जिल्हा पत्रकारांच्या सांगण्यावरून संपादक दीपक खरात गुरुजी यांनी त्यांच्यावर पुणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे.
कांता (भाऊ )राठोड हे पत्रकारी ते बरोबर ते पुण्यामध्ये सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे ते झेप फाउंडेशन पुणे( महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक/ अध्यक्ष , आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना व माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष आहेत  ते झेप फाउंडेशनच्या व पत्रकार क्षेत्राच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम करतात व लोकांच्या अडचणी चे निवारण करण्यासाठी नेहमी तत्पर असतात.
यावेळी त्यांनी संपादक दीपक खरात गुरुजींनी पुणे जिल्हा प्रमुख पदाची जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडू असे त्यांनी  पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart