Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

स्थापना दिन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्थापना दिन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात भाजपचा स्थापना दिवस उत्साहात साजरा - चेतनसिंह केदार सावंत .

सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात भाजपचा स्थापना दिवस उत्साहात साजरा - चेतनसिंह केदार सावंत .



सांगोला (तालुका प्रतिनिधी): सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात भाजपचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पाच विधानसभा मतदारसंघातील १४ मंडलामध्ये २०५६ पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या ऑनलाइन कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संघटन पर्वचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. 
      भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाचे सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना दीड कोटी सदस्य नोंदणी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात २ लाख ७८ हजार ९१३ सदस्य नोंदणी झाली आहे. माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी भाजपच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. 
     भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथे भाजप पक्ष कार्यालयात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ऑनलाइन कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, बाळाप्पा येलपले, लक्ष्मण येलपले, अनिल चौगुले, विनायक बाबर, विष्णू हिप्परकर, मोहन बजबळे, सागर बजबळे, विश्वास करडे, विजय पवार, गणेश घाडगे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख उपस्थित होते.

सोमवार, ७ एप्रिल, २०२५

नाझरे येथे भारतीय जनता पार्टीचा 45 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

नाझरे येथे भारतीय जनता पार्टीचा 45 वा वर्धापन दिन उत्साहात  साजरा.

नाझरे येथील जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टीचा 45 वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
  भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याला मान सन्मान देणारी पार्टी आहे लोकसभेला सुरुवातीला वाजपेयी यांच्या काळात फक्त दोन खासदार असणारी भारतीय जनता पार्टी आज प्रचंड ताकतीने सत्तेत आहे या भारतीय जनता पार्टीला ही जगातील सर्वात मोठी पार्टी आहे कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने हा पक्ष मोठा झाला आहे असं प्रतिपादन नंदकुमार रामचंद्र रायचूरे यांनी या वेळी केले.
 यावेळी पोपट सरगर बूथ प्रमुख सरगरवाडी, अमरबापु नंदकुमार रायचूरे भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस सोलापूर ग्रामीण ,अक्षय रायचुरे भाजप नेते नाझरे मंगेश सुतार कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

जुजारपूर येथे भारतीय जनता पक्षाचा ४६ स्थापना दिन साजरा.

जुजारपूर  येथे भारतीय जनता पक्षाचा ४६  स्थापना दिन साजरा.
वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला तालुका जुजारपूर येथे भारतीय जनता पक्षाचा ४६ वा स्थापना दिन साजरा करण्यात आला
  कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत ,तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर यांच्या हस्ते भारत माता, पंडित दीनदयाळ शर्मा, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या वेळी  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्व कार्यकर्त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले तसेच भारतीय जनता पार्टीचे 1.50 कोटी भाजपा सदस्य पूर्ण झाले त्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी कार्यक्रमास   बाळाप्पा येलपले, विजय पवार,  लक्ष्मण येलपले,  गणेश घाडगे,  अनिल पवार,  विनायक बाबर,  प्रमोद बाबर  सागर बजबळे,  विष्णू हिप्परकर, विश्वास करडे तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart