Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त आरोग्य शिबिर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त आरोग्य शिबिर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ७ फेब्रुवारी, २०२४

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अनकढाळ टोल नाका येथे नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर .

 रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अनकढाळ टोल नाका येथे नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर .


वाटंबरे /प्रतिनिधी:रस्ता सुरक्षा बाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी देशात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. दि १५ जानेवारी ते१४ फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे या पार्श्वभूमीवर बोरगाव वाटंबरे हायवे प्रायव्हेट लिमिटेड ३५ राष्ट्रीय रोड सेफ्टी अवेअरनेस यांच्या वतीने बुधवार दि. ७ फेब्रुवारी रोजी अनकढाळ टोल नाका येथे वेदांत हॉस्पिटल व चंद्रभागा नेत्रालय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले गेले होते.


या शिबिराचे उद्घाटन अकलूज उपप्रादेशिक परिवहनचे मोटार वाहन निरीक्षक झाडबुके यांच्या हस्ते करण्यात आले .


या वेळी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गावडे , चालक मकरे, राष्ट्रीय महामार्ग पोलीस, इंगलेश शर्मा, विष्णूदत्त शर्मा ,सचिन चहल, गौरव प्रताप सिंग तसेच वेदांत हॉस्पिटल टीम व चंद्रभागा नेत्रालय टीम यावेळी उपस्थित होते.


या आरोग्य शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहन चालक, टोलनाका कर्मचारी  तसेच ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदविला. 



Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart