भरधाव कारच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार.
वाटंबरे/ प्रतिनिधी: रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती सांगोला तालुक्यातील जुनोनी हद्दीत बरगाव कारणे पाठीमागून मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल वरील युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना बुधवार दि. 18 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ, करांडेवाडी फाटा येथे घडली.
याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात विजय रघुनाथ भंडारे (वय 28, रा. पाचेगाव खुर्द, ता. सांगोला) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सिद्राम संजय आयवळे (वय 23, रा. मजरेवाडी, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयवळे हा त्याच्या ताब्यातील चिव्होरलेट कंपनीच्या MH-02-BM-0815 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवत होता. त्यावेळी त्याने हिरो कंपनीची MH-45-AA-0535 क्रमांकाची मोटारसायकल चालवणारे अजय रघुनाथ भंडारे (वय 35, रा. पाचेगाव खुर्द, ता. सांगोला) यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
या धडकेत अजय भंडारे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मोटारसायकलीचे सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलीस निरीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ घोंगडे करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा