Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

उद्घाटन समारंभ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उद्घाटन समारंभ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १९ मार्च, २०२६

दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे नवीन अद्ययावत सुसज्ज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्सचे उद्घाटन संपन्न*

*दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे नवीन अद्ययावत सुसज्ज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्सचे उद्घाटन संपन्न*
*जय भवानी चौक सांगोला येथिल उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा देण्यात अग्रेसर असणाऱ्या दक्षता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे नवीन सुसज्ज ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन सर्व डॉक्टर्स मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अद्ययावत सुसज्ज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्सचे उद्घाटन दक्षता हॉस्पिटल मधील सर्व डायरेक्टर्स, डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, सर्व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पडले. साडेतीन शुभ मुहूर्तापैकी अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या गुढीपाडवा या शुभ मुहूर्ता दिवशी व नवीन मराठी वर्षानिमित्त सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. 
दक्षता हॉस्पिटल येथे महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना यांच्या अंतर्गत मेडिसिन विभाग, हृदयरोग व कॅथलॅब विभाग, मुत्ररोग विभाग,डायलिसिस विभाग,बालरोग विभाग, सर्जरी व गॅस्ट्रो इंटरोलॉजी विभाग,अस्थीरोग विभाग कार्यरत आहेत. या विभागा अंतर्गत सध्या सुसज्ज आय.सी.यू, सुसज्ज कार्डियाक केअर युनिट , सुसज्ज ऑपरेशन थिएटर, कॅथलॅब इत्यादी सुविधा उपलब्ध असून आज दक्षता हॉस्पिटल च्या वतीने"नवीन अद्ययावत सुसज्ज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स" हे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चालू करून वैद्यकीय सुविधेची मुहूर्तमेढ रोवली आहे . या अत्याधुनिक सुविधेमुळे सांगोल्याच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणखीनच भर पडली आहे. या कार्यक्रमासाठी दक्षता हॉस्पिटल मधील डॉ.शिवराज भोसले,डॉ.दत्तात्रेय इंगोले, डॉ.प्रवीण पैलवान, डॉ. फिरोज तांबोळी, डॉ. सचिन लिगाडे,डॉ.निरंजन केदार, डॉ.महादेव जगताप,श्री.विलास इंगळे,डॉ.अण्णासो लवटे,डॉ.आश्लेषा मासाळ,डॉ .धनश्री रायभान तसेच हॉस्पिटल मधील सर्व मेडिकल ऑफिसर्स, नर्सिंग स्टाफ ,पॅरामेडिकल स्टाफ व सर्व कर्मचारी उपस्थित होते*.

बुधवार, १७ सप्टेंबर, २०२५

शारदादेवी महिला सेवा कार्यालयातून महिलांना त्यांचा हक्क मिळेल ; आमदार रोहित पाटील

 शारदादेवी महिला सेवा कार्यालयातून महिलांना त्यांचा हक्क मिळेल ; आमदार रोहित पाटील 


सांगोला येथे शारदादेवी महिला सेवा कार्यालयाचे उद्घाटन 



सांगोला : तालुका प्रतिनिधी 


स्व शारदादेवी साळुंखे पाटील तथा सर्वांच्या लाडक्या काकीनी संपूर्ण आयुष्यभर उपेक्षित आणि दुर्लक्षित घटनांना न्याय देण्याची भूमिका घेतली. त्यांनी कधीच जाती पातीचा आणि पक्ष पार्टीचा विचार केला नाही.त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन सांगोला येथे सुरू करण्यात आलेल्या शारदादेवी महिला सेवा कार्यालयातून सांगोला शहर आणि तालुक्यातील पीडित महिलांना नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला. 

यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, माजी नगरसेवक सचिन लोखंडे, सिद्धेश्वर उर्फ नाथा जाधव आदीसह राणी उर्फ आफरीन शेख, रेश्मा खतीब, पुजा बोराटे संध्या काटे व शोभा शिंदे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. 

सांगोला शहर आणि तालुक्यातील अनेक महिलांना घरगुती, सामाजिक, शैक्षणिक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी त्यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळावे याच भावनेतून सांगोला येथील महिलांनी स्वतः पुढे येऊन शारदादेवी महिला सेवा कार्यालय सुरू केले आहे या कार्यालयातून नक्कीच महिलांना त्यांचा हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी मदत होईल असा आशावाद शेवटी आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला. 



चौकट ; 


स्व शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या विचारातून आणि संस्कारातून सुरू झालेल्या या सेवा कार्यालयातून सांगोला तालुक्यातील गोरगरीब, दिनदलीत, बहुजन तसेच शेतकरी-शेतमजूर महिलांचे प्रश्न सुटावेत हीच आमची अपेक्षा आहे. सांगोला तालुक्यातील दीन दलीत पीडित उपेक्षित आणि शेतमजूर महिलांना या सेवा कार्यालयातून नक्कीच हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.


मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

सेवाभावी वृत्तीने काम करा यश मिळेल - आयकर आयुक्त डॉ. सचिन जी मोटे

सेवाभावी वृत्तीने काम करा यश मिळेल -  आयकर आयुक्त डॉ. सचिन जी मोटे

{हॉटेल बालाजीचे उद्घाटन संपन्न}

सांगोला प्रतिनिधी
                 कोणताही व्यवसाय, उद्योग करताना सेवा देणे गरजेचे आहे व बालाजी यांनी आज पर्यंत प्रेमाने व सेवाभावी वृत्तीने केटरर्स चे काम केले त्यामुळे त्यांना यश प्राप्ती होणारच असे आयकर उपायुक्त मुंबई डॉ. सचिन जी मोटे यांनी हॉटेल बालाजी उद्घाटन प्रसंगी आटपाडी येथे मत व्यक्त केले. सुरुवातीस प्रमुख मान्यवरांचे स्वागत बालाजी व अक्षय पावले यांनी केले.
             सदर प्रसंगी आमदार गोपीचंदजी पडळकर, अध्यक्ष तानाजीराव पाटील, मा.जि.प. अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख, डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील, माजी सभापती रुक्मिणीताई यमगर, भारत दादा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, दत्तात्रय पंच पाटील, विनायकराव मासाळ साहेब, महालिंग टिंगरे साहेब, सुदाम तात्या अर्जुन, जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ खरात, शहाजी बापू जाधव, अंकुश महाराज भोसले, अमोल काटकर, सरपंच दीपक देशमुख, जितेंद्र गीडै, रास प नेते उमाजी चव्हाण, लक्ष्मण सरगर, अजित शेठ कटरे, घमाशेठ बुरुंगले, उद्योजक सतीश जवळे, भारत आप्पा जवळे, कांता शेठ जवळे, किरण शेठ पांढरे, सुनील आईवळे, अजिंक्य राऊत सर, डी एम पाटील सर, अक्षय शेठ अर्जुन, कारभारी मनोज नांगरे, संतोष शेटे, अनिल टिंगरे, स्वानंद लाळे काका, तानाजी ऐवळे, इंजिनीयर महेश कुमार पाटील, हनुमंत मोटे, उपसरपंच विजय देवकर, विजय पुजारी सर, गिरी सर, मारुती हेगडे, दयानंद देठे, पावले परिवार इत्यादी उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार बालाजी पावले यांनी मानले.

मंगळवार, १६ जानेवारी, २०२४

अनकढाळ टोल प्लाजा येथे गुरुमाऊली आयुर्वेदिक चिकित्सालयाचे उद्घाटन.

अनकढाळ टोल प्लाजा येथे गुरुमाऊली आयुर्वेदिक चिकित्सालयाचे उद्घाटन.


वाटंबरे / प्रतिनिधी : सांगोला तालुका अनकढाळ टोल प्लाजा येथे मल्हारी पवार व वैद्य महादेव बंडगर यांनी चालू केलेल्या गुरुमाऊली आयुर्वेदिक चिकित्सालयाचे उद्घाटन बुधवार दि.१७ जानेवारी रोजी संपन्न झाले.
या चिकित्सालयाचे उद्घाटन वाटंबरे गावचे सरपंच किरण पवार यांच्या हस्ते फित कापत संपन्न झाले .
या उद्घाटना वेळी तालुका नियोजन समिती सदस्य विजय पवार, सौ.रतन बंडगर, अनकढाळचे माजी सरपंच पिंटू बंडगर, सोसायटी चेअरमन नाना बापू पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य खंडू पवार, अनकढाळ ग्रामपंचायत सदस्य वस्ताद बंडगर, पोपट पवार, प्रतीक पवार, दिगंबर साळुंखे ,भारत पवार , उद्योगपती पंढरीनाथ पवार , उद्धव पवार , मोठ्या प्रमाणावर नागरिक यावेळी उपस्थित होते.

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart