Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

पत्रकार परिषद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पत्रकार परिषद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २८ मे, २०२५

बेशिस्त वागल्यास सोडणार नाही..- पोलीस निरीक्षक विनोद घुगे*

 *बेशिस्त वागल्यास सोडणार नाही..- पोलीस निरीक्षक विनोद घुगे*


*नाझरे, कोळा, घेरडी, महूद येथे पोलीस आऊट पोस्टला कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करा..- रविराज शेटे*

नाझरे प्रतिनिधी 

      सांगोला पोलीस स्टेशनचा पदभार पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी घेतल्यापासून तालुक्यातील अवैध धंदे, जनावराची अवैध वाहतूक, चार चाकी वाहने, वाहतूक व्यवस्था यावर दंडात्मक कारवाई करून एक वेगळा ठसा कामाचा निर्माण केला असून, चुकीला माफी नाही व कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. तसेच बेशिस्त वागल्यास सोडणार नाही असेही यावेळी सांगितले. 


     सांगोला पोलीस स्टेशन व पत्रकार यांच्यात विचार विनिमय करण्यासाठी सदरची बैठक आयोजित केली होती व यावेळी सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांनी नाझरे,  कोळा, महूद, घेरडी येथील नागरिकांना आपल्या अडीअडचणी व तक्रारी संबंधात सांगोल्यास यावे लागते तर तेथे कायमस्वरूपी निवासी पोलीस कर्मचारी नेमल्यास प्रश्न सुटेल व यासाठी पोलीस कर्मचारी आऊट पोस्टला नेमा अशी मागणी सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांनी केली. तर सांगोला तालुक्याचे कार्यक्षेत्र मोठे व पोलीस कर्मचारी संख्या कमी आहे परंतु यावर आपण लवकरच तोडगा काढून नाझरे, कोळा, घेरडी व महूद येथे कायमस्वरूपी निवासी पोलिसाची नेमणूक करू अशी हमी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी यावेळी दिली. 

     तसेच दुचाकी स्वरांनी हेल्मेटचा वापर करावा व गाडीला लॉक करतेवेळी फोर लॉक लावावे व गाडी बेफाम चालवून अपघाताला निमंत्रण देऊ नये असा मौलिक सल्लाही घुगे यांनी यावेळी दिला. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पत्रकारांनी जनजागृती करून सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी यावेळी केले. शेवटी सर्वांचे आभार रविराज शेटे यांनी मानले.

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart