Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सामाजिक कार्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक कार्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३ जून, २०२५

जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी शारदादेवी करमाफी अभियान योजना संपूर्ण राज्यात आणि जिल्ह्यात राबवावी म्हणून दिपकआबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेणार ; सरपंच सज्जन मागाडे

जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी शारदादेवी करमाफी अभियान योजना संपूर्ण राज्यात आणि जिल्ह्यात राबवावी म्हणून दिपकआबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेणार ; सरपंच सज्जन मागाडे 
सांगोला / तालुका प्रतिनिधी 

सध्या सर्वत्र खासगी शाळांचे पेव फुटल्याने पट संख्येच्या अभावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडू लागल्या आहेत. गोर गरिबांच्या मुलांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शारदादेवी करमाफी अभियान संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात राबवावे या मागणीसाठी आपण लवकरच सरपंचाचे शिष्टमंडळ घेऊन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे सक्षम आणि कर्तव्यनिष्ठ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेणार आहोत अशी माहिती जवळा ग्रामपंचायतीचे सरपंच सज्जन मागाडे यांनी दिली. 

जवळा ता सांगोला या आध्यात्मिक नगरीत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला घरपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. सोशल मीडियावर आणि संपूर्ण राज्यात या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. म्हणून हाच निर्णय संपूर्ण राज्यासाठी घेण्यात यावा यासाठी काही निधीची गरज लागली तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या निधीची तरतूद करून बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्हा परिषद शाळांना जीवनदान द्यावे. सध्या सर्वत्र शिक्षणाचे व्यावसायिकरण झाल्याने खासगी शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी भरमसाठ फी मोजावी लागत आहे. ग्रामीण भागातील हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेला असे शिक्षण परवडत नसल्याने त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळा हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. खासगी शैक्षणिक संस्थांच्या स्पर्धेत जर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या तर गरिबांच्या मुलांना शिक्षणाचे धडे गिरवता येत येणार नाहीत. म्हणूनच विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आणि गेल्या १०० दिवसांत आपल्या कामाचा ठसा उमटवून ग्रामविकास खात्याला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे कर्तबगार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे या विषयाकडे लक्ष वेधून जिल्हा परिषद शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला घरपट्टी पाणीपट्टी आणि सर्व स्थानिक कर माफ करावे ही मागणी घेऊन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंचाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेणार असल्याचे शेवटी सरपंच सज्जन मागाडे यांनी स्पष्ट केले.

रविवार, ११ मे, २०२५

प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारावी या हेतूने महिलांना सबळ करण्याचे काम पत्रकार सचिन धांडोरे यांनी केले आहे; डॉ निकिताताई देशमुख

प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारावी या हेतूने महिलांना सबळ करण्याचे काम पत्रकार सचिन धांडोरे यांनी केले आहे; डॉ निकिताताई देशमुख 
पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व माणदेशी फाउंडेशन अंतर्गत अजनाळे येथे आयोजित करण्यात आलेल्या फॅशन डिझायनर व ब्युटी पार्लर कोर्सचा सांगता समारंभ व महिला मेळावा संपन्न...


सांगोला : देशामध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली असताना शासनाने विविध कार्यक्रमावरती निर्बंध लादले असताना देखील पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार यांनी माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांची आर्थिक परिस्थिती सुधरावी या हेतूने पत्रकार सचिन धांडोरे यांनी महिलांना सबळ करण्याचे काम केले असल्याचे मत डॉ निकिताताई देशमुख यांनी व्यक्त केले 

काल शनिवार दि १० मे रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत सभागृह अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे व माणदेशी फाउंडेशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ब्युटी पार्लर व फॅशन डिझायनर कोर्स सांगता समारंभ व महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. 
याप्रसंगी सरपंच अनिता पवार, उमेदचे अण्णासाहेब आवताडे, माजी सरपंच सुजाता देशमुख, उपविभागीय दक्षता सनियंत्रण समितीचे सदस्य पंकजकुमार काटे, युवा नेते चंद्रकांत पवार, अमोल सावंत, सोनाली मोरे, करिष्मा तांबोळी, ज्योती महांकाळ, करण मोरे, चैत्राली भंडगे, काजल बनसोडे, महेश साठे, गणेश गुरव, सुजित गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
पुढे बोलताना डॉ निकिता ताई देशमुख म्हणाल्या की, डाळिंब उत्पादनाच्या बाबतीत जगामध्ये वेगळी ओळख निर्माण केलेल्या अजनाळे गावाने वेगळी ओळख निर्माण केली आहे.मला खरंच आनंद वाटतोय की या गावामध्ये चांगल्या प्रकारे प्रशिक्षण राबवले आहे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाले आहे महिलांनी या प्रशिक्षणाकडे व्यवसाय म्हणून बघितले पाहिजे पण व्यवसाय करण्यासाठी महिलांना भांडवलाची गरज निर्माण होते या साठी गावामध्ये आयोजित केलेल्या उमेद च्या मीटिंग साठी उपस्थित राहणे गरजेचे आहे उपस्थित राहिल्या नंतरच महिलांना सर्व शासकीय योजनांची माहिती मिळत असते. महिला उमेदच्या माध्यमातून कर्ज घेतात परंतु ते घेतलेले कर्ज एखाद्या छोट्या-मोठ्या व्यवसायासाठी वापरून त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून महिलांनी आपल्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या पाहिजेत महिला कर्ज घेतात परंतु ते कर्ज व्यवसायासाठी न वापरता आपल्या घरगुती अडी अडचणीसाठी वापरत असतात महिलांनी असे न करता प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याचा वापर व्यवसायासाठीच केला पाहिजे. या वेळी शैला गायकवाड, मयुरी येलपले ,रजनी धांडोरे यांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी महिला विद्यार्थिनी यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समाधान धांडोरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदर्शन वाघमारे,महेश चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. फोटो

चौकट : अजनाळे गावात पत्रकार सचिन धांडोरे यांनी व माणदेशी फाउंडेशनच्या सहकार्यातून ब्युटी पार्लर व फॅशन डिझायनर हे प्रशिक्षण ३० दिवस आपल्या गावात चालले आहे या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी जो महिलांच्या चेहऱ्यावर आनंद होता त्याच्या कित्येक पटीने जास्त आनंद महिलांच्या चेहऱ्यावर आहे. आमच्या गावातील महिलांना शिकण्याची जिद्द आहे महिलांनी यापुढेही ग्रामपंचायतच्या व अन्य सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांना अशीच महिलांनी साथ देवुन सहभागी झाले पाहिजे.

सरपंच अनिता पवार 
ग्रामपंचायत अजनाळे 

चौकट : अजनाळे गावात सामाजिक भान ठेवून या गावात काम करणारी समाधान धांडोरे व सचिन धांडोरे ही दोन माणसे आहेत केवळ पुढारपणासाठी काम करत नाहीत आपल्या कुटुंबाचा ,शेजाऱ्याचा गावाचा विकास करणारी अशी ध्येय डोळ्यासमोर ठेवून धडपड करणारी कार्यकर्ते कमी असतात सचिन व समाधान यांची जोडी या गावात आहे त्यांचा जास्तीत जास्त फायदा विविध शासकीय योजना मिळवून घेण्यासाठी करावा त्यांच्या हातून अशा अनेक योजना या गावांमध्ये राबवण्यात याव्या या योजनेचा गावातील दिन दलित ,पीडित ,वंचित जी कुटुंब आहेत त्यांच्या आर्थिक विकास प्रगतशील लोकांच्या बरोबरीने होऊन त्यांचा आर्थिक स्तर सुधारण्यात यावा सचिन धांडोरे यांनी बांधकाम कामगार या योजनेच्या माध्यमातून अजनाळे गावात गेल्या तीन ते चार महिन्यात जवळपास १५ ते १६ लाख रु शिष्यवृत्ती व इतर योजनांचा लाभ असंघटित कामगारांना मिळवून दिला आहे.

पंकजकुमार काटे
उपविभागीय दक्षता व सनियंत्रण समिती सदस्य

गुरुवार, १० एप्रिल, २०२५

सांगोला तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना तातडीने शासनाने पाच ब्रास मोफत वाळूचा पुरवठा करावा : नितीन रणदिवे.

सांगोला तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना तातडीने शासनाने  पाच ब्रास मोफत वाळूचा पुरवठा करावा : नितीन रणदिवे.

सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुल लाभार्थ्यांचा समावेश असून शासनाकडून घरकुलासाठी मिळणारा निधी अपुरा आहे. शासनाने नुकतेच जाहीर केले आहे की घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी मोफत पाच ब्रास वाळू, रेती देण्याची घोषणा केली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून बांधकाम खर्च, विटा, वाळू,सिमेंट, मजूर खर्च, पाणी खर्च भागवणे मुश्किल होत आहे. तरी शासनाने मदत म्हणून घरकुल लाभार्थ्यांना त्वरित मोफत पाच ब्रास वाळूचा पुरवठा करावा अशी मागणी लहुजी पॅंथर सेनेचे अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे यांच्याकडून करण्यात येत आहे.
 घरकुल लाभार्थ्याला शासनाकडून अपुरा निधी दिला जात असून या निधीतून घरकुलाचे काम पूर्ण करणे अवघड आहे . शासनाकडून मिळणाऱ्या निधी शिवाय लाभार्थ्याला स्वतः जवळील मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात. शासनाकडून मिळणाऱ्या निधीमध्ये लाभार्थ्यांचा वाळू, सिमेंटचा खर्च भागत नाही तर घर कसे उभे करावे हा प्रश्न लाभार्थ्यापुढे आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे परंतु त्याची अंमलबजावणी वेळेवर होताना दिसत नाही. या सर्व गोष्टीचा विचार करून शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास किंवा त्याहून अधिक वाळू मोफत देऊन त्याच्या घराच्या स्वप्नाला हातभार लावावा अशी मागणी नितीनभाऊ रणदिवे यांनी केली आहे.

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart