कडलास येथील जिल्हा प्राथमिक शाळेच्या रस्त्याबाबत तातडीची कार्यवाही.
कडलास येथील जिल्हा प्राथमिक शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने शाळकरी मुले व पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येबाबत कडलास येथील युवकांनी आज योगेश दादा खटकाळे यांची भेट घेऊन परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
या समस्येची तात्काळ दखल घेत योगेश दादा खटकाळे यांनी संबंधित यंत्रणेला आदेश देऊन रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करून देण्याचे आश्वासन दिले. आदेश मिळताच कामाची प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात आली आहे.
रस्त्याची दुरुस्ती झाल्यानंतर शाळेत ये–जा करणाऱ्या लहान मुलांना व पालकांना होत असलेला त्रास दूर होणार असून, या तातडीच्या निर्णयाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या अडचणींमध्ये तात्काळ धावून जाण्याची जी परंपरा निर्माण झाली आहे, त्याच परंपरेनुसार ही कार्यवाही करण्यात आली, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
तसेच शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर आणि जनतेशी असलेल्या भावनिक नात्यावर विश्वास ठेवून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना–भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. शोभाताई बाबासाहेब खटकाळे यांना कडलास परिसरातून चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
जनतेच्या प्रश्नांवर संवेदनशीलपणे आणि तत्काळ निर्णय घेणारे नेतृत्व हीच महायुतीची खरी ताकद असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा