गुरुवार, २९ मे, २०२५
बापूंचं काम बोलत राहणार!
शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५
सांगोल्यात शेतकऱ्यांकडून फलटणच्या नेत्यांना जोडे मारो आंदोलन .
सांगोल्यात शेतकऱ्यांकडून फलटणच्या नेत्यांना जोडे मारो आंदोलन .
महूद येथे शिवसेना व निरादेवधर लाभ क्षेत्रातील शेतकऱ्याच्या वतीने फलटणचे नेते संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रति कात्मक चित्राला जोडी मारून जाहीर असा निषेध करून घोषणाबाजी करत जोडी मारू आंदोलन करण्यात आले बुधवारी मुंबई येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब व माजी आमदार शहाजी बापू पाटील साहेब व इतर नेत्यांच्या उपस्थितीत निरादेवधरचे सांगोला तालुक्याला लाभक्षेत्रात तसेच पंढरपूर तालुक्यातील काही भागाला एक टीएमसी पाणी मंजूर करायचे ठरले असून तसा शासन निर्णयही झाला आहे पिढ्यानपिढ्या पाण्यासाठी धरपडणारी शेतकरी व कष्टकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून कालच शहाजी बापू पाटील साहेब यांचा सांगोल्यात ठीक ठिकाणी सत्कार फटाक्यांची आतिषबाजी व पेढे भरून याचा कार्यक्रम झाला यालाच गालबोट म्हणून काल फलटण येथे काही नेत्यांची बैठक होऊन संजीव राजे निंबाळकर दीपक चव्हाण आदी लोकांनी सांगोला तालुक्याला व पंढरपूरला पाणी देण्याबद्दल विरोध दर्शवला म्हणून आज महूद येथे शिवसेनेच्या वतीने व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने संजीव राजे निंबाळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून विरोधात घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले यावेळी शहाजी बापू पाटील साहेब यांच्या नावाचा जयजयकार करण्यात आला यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे संजय मेटकरी राजेंद्र मिटकरी
सरपंच सुरेश कदम कालिदास भोसले प्रमोद उबाले नवनाथ येडगे ओंकार पाटील अरुण भाऊ नागणे सोमनाथ मरगर तानाजी भोसले उदयसिंह पाटील दीपक सरगर चेअरमन महेश पाटील कुंडलिक पवार अमोल सरडे तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते यावेळी शिवसेना नेते दादासाहेब लवटे यांनी मा आमदार शहाजी बापू पाटील यांची काम करण्याची पद्धत कशी योग्य आहे पाण्यासाठी असणारी तळमळ किती बरोबर आहे परंतु विद्यमान आमदार व विद्यमान खासदार या विषयावर पाणी आम्ही आणलं म्हणून दावा करतात व आतील बाजूनी फलटणची बाजू घेतात अशी घनाघाती टीका करत आमदार व खासदार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान केले
शनिवार, २९ मार्च, २०२५
सांगोल्यासाठी राजेवाडी, निरेचे पाणी सोडण्याची चेतनसिंह केदार सावंत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४
पाणीप्रश्नांच्या पाठपुरव्याला यश, विस्तारित टेंभूसाठी ७५३ कोटींची निविदा प्रसिद्ध - आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला (प्रतिनिधी): टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अतिरिक्त आठ टीएमसी पाणी वाटपाच्या आराखड्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. सांगोला तालुक्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तसेच टेंभू, म्हैसाळ योजनेची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. या पाठपुराव्याला यश आले आहे. विस्तारित टेंभू योजनेच्या कामाची ७५३ कोटी ७९ लाख रुपयांची निविदा शासनाने काढली असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
. विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजना आणि म्हैसाळ योजनेस मंजुरी मिळावी, यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. सांगोला तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी शासनाने विस्तारित टेंभू योजनेच्या कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील गावे ओलिताखाली येणार आहेत. विस्तारित योजनेसाठीही पुढाकार घेऊन पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने सुमारे ७५३ कोटी ७९ लाख रुपयांच्या कामाची ई-निविदा काढल्याने माझ्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचे काम पूर्ण झाले असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
टेंभू योजनेच्या विस्तारित कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून यातून बेवनूर थेट गुरुत्व नलिका व त्यावरील वितरिका, लघुवितरिकांचे काम बंदिस्त पाईपलाईन पद्धतीने करणे, पुढील पाच वर्षासाठी देखभाल दुरुस्ती व परीचलन करण्यात येणार आहे. तसेच सातत्याने पाठपुरावा केल्याने म्हैशाळ उपसा सिंचन योजनेमध्ये नवीन ८ वंचित गावांचा समावेश केल्याने आता म्हैशाळ योजनेमध्ये घेरडी, सोनंद, पारे, वाकी घेरडी, वाणीचिंचाळे, आलेगाव, मेडशिंगी, तरंगेवाडी, भोपसेवाडी, जवळा व आगलावेवाडी या गावांसह पारे, हंगिरगे, जवळा व नराळे येथील तलावांचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच टेंभू योजनेतील कामत गुरुत्व नलिकेतून ५ हजार ४३१ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. तर डोंगरगाव, हणमंतगाव, मानेगाव, काळूबाळूवाडी, गुणापाचीवाडी व हटकर मंगेवाडी या सहा गावांना ९०३ हेक्टर क्षेत्राला बेवनूर गुरुत्व नलिकेतून पाणी मिळणार आहे. एकूणच १९ गावांमधील ६ हजार ३३४ हेक्टर क्षेत्राला या एक टीएमसी पाण्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
चौकट
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सांगोल्यासाठी पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. यावेळी उन्हाची तीव्रता लक्षात घेवून उन्हाळी हंगामासाठी दोन महिने कालवा चालविण्याचे ठरले आहे. पाण्याची गरज लागली तर त्यापुढे आठ दहा दिवस. कालवा चालविण्याचे ठरले आहे असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४
कलबुर्गी - कोल्हापूर रेल्वेला सांगोल्यात थांबा
याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, कलबुर्गी - कोल्हापूर ही रेल्वे सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली होती. मात्र, या रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने सांगोल्यासह आसपासच्या परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेवून कलबुर्गी - कोल्हापूर रेल्वेला सांगोला स्थानकात थांबा मिळावा यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर खासदार निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी कलबुर्गी - कोल्हापूर रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांबा देण्याचे निर्देश रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
रेल्वे मंत्रालयाचे संयुक्त निदर्शक विवेककुमार सिन्हा यांनी कलबुर्गी - कोल्हापूर रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांब्याला मंजुरी दिली असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे कलबुर्गी - कोल्हापूर रेल्वेला सांगोल्यात थांबा मंजूर करण्यात आला असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगितले.
मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४
पंढरपूर येथे भाजपचे गाव चलो अभियानास सुरुवात.
पंढरपूर येथे भाजपचे गाव चलो अभियानास सुरुवात.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजप कार्य करत आहे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांनी सर्व सामान्यजनते पर्यंत पोहोचवावी यासाठी *गाव चलो अभियान* सुरू करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत मंगळवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर येथे भाजपा पंढरपूर दक्षिण मंडलाच्या वतीने गाव चलो अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेस माढा लोकसभा निवडणुक प्रमुख मा. आ. श्री.प्रशांत परिचारक साहेब , माढा लोकसभा समन्वयक मा.श्री.राजकुमार नाना पाटील साहेब, जिल्हाध्यक्ष मा.श्री चेतनसिंह केदार - सावंत साहेब, यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस मा.सचिन शिंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप,गाव चलो अभियान जिल्हा संयोजक लक्ष्मण केंकान,माढा लोकसभा विस्तारक मा.श्री.अनंत राऊत ,पंढरपूर मंडल अध्यक्ष भास्कर कसगावडे, विधानसभा विस्तारक वारपे ,सर्व सुपर वॉरियर्स ,गाव चलो अभियान प्रवास कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.







Social Media Icons