Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

निरोप समारंभ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निरोप समारंभ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १३ एप्रिल, २०२४

निरोप घेताना विद्यार्थ्यांच्या डोळे पाणावले.

निरोप घेताना विद्यार्थ्यांच्या डोळे पाणावले. 


{वाटंबरे केंद्रशाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न }

वाटंबरे /प्रतिनिधी:   या शाळेतील शिक्षकांनी शिस्त लावून विद्यार्थी म्हणून आमचा सर्वांगीण विकास घडवला.एक माणूस म्हणून कसे जगावे याचे धडे दिले. आम्ही भविष्यात नक्की एक उत्तम नागरिक बनू, आपापल्या क्षेत्रात यशस्वी होवू.पण आज ही शाळा सोडताना आमच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत असे भावोद्गार इयत्ता चौथीच्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभात आपले मत व्यक्त केले. 

   या वेळी चौथीचे शिक्षक पांडुरंग कोकरे यांनीही या विद्यार्थ्यांविषयी बोलताना सांगितले की, पहिली दोन वर्षे कोरोनामुळे गेली असताना तिसरी आणि चौथीच्या वर्गात या विद्यार्थ्यांना दोन वर्षांत चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे हे आव्हान होते परंतु विद्यार्थ्यांनी खुप छान प्रतिसाद दिला आणि सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक क्षमता उत्तम प्रकारे अंगिकारल्या आहेत.भविष्यात हे विद्यार्थी निश्चितपणे उत्कृष्ट पद्धतीने यशस्वी होतील आपले मनोगत व्यक्त करतान ते पूर्णपणे भावुक झाले होते.
 शाळेतील शिक्षक अरुण मासाळ, मुख्याध्यापिका बनाबाई पवार, राधा तेली ,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दिगंबर साळुंखे यांनीही आपली मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
   यावेळी वाटंबरे गावचे नुतन सरपंच नामदेव पवार यांचा सरपंचपदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 
  या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष , भाग्यवान पवार उपाध्यक्ष प्रज्ञा चंदनशिवे, दिगंबर साळुंखे,शिक्षणतज्ज्ञ दिग्विजय पवार व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

चिणके व आजुबाजूच्या परिसरामध्ये तरस प्राण्यांचे दर्शन.

 चिणके व आजुबाजूच्या परिसरामध्ये तरस प्राण्यांचे दर्शन. 

{फोटो: चिणके या ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधत तरस प्राण्या विषयी जनजागृती करत असताना वन कर्मचारी या वेळी उपसरपंच मोहन मिसाळ उपस्थित होते}

   {नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण}

वाटंबरे /प्रतिनिधी : चिणके , अजनाळे य. मंगेवाडी, लिगाडे वाडी { ता. सांगोला} येते तीन ते चार दिवसापासून तरस हा प्राणी दिवसा ढवळ्या फिरत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले  आहे याने आता पर्यंत कोणावरही    हल्ला केलेला नसल्याचे   प्राथमिक माहिती समोर येत आहे . 
चिणके गावचे उपसरपंच मोहन मिसाळ यांनी  वन विभागाशी संपर्क साधून या प्राण्याची माहिती त्यांना दिलेली आहे तसेच लवकरात लवकर या प्राण्याला पकडून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने त्यांनी वनविभागाशी केलेली आहे . 


चौकट:
{ चिणके ,अजनाळे,य.मंगेवाडी,लिगाडे वाडी या ठिकाणी तरस हा प्राणी फिरत असल्याची माहिती आम्हाला चिणके गावचे उपसरपंच मोहन मिसाळ यांनी फोनवरून सांगितलेली आहे तरी त्या प्राण्याबद्दल नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे भीती बाळगू नये आमच्या विभागातील कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवून देऊन त्या प्राण्याविषयी नागरिकांमध्ये असणारी भीती विषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करू तसेच त्या प्राण्याने कोणत्याही पाळीव प्राण्यावर तसेच माणसावर हल्ला केला असेल तर त्यांनी वन विभागाशी संपर्क साधावा .

वनपरिक्षेत्र अधिकारी
तुकाराम जाधवर.}




Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart