Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

जन आरोग्य योजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जन आरोग्य योजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ६ जून, २०२५

दिशा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू - डॉ. सचिन गवळी.

दिशा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू - डॉ. सचिन गवळी.

सांगोला ( प्रतिनिधी )- सांगोला शहरातील कडलास नाका येथील दिशा हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू झाली असून याचा लाभ गरजू रुग्णांनी  घ्यावा असे आवाहन डॉ. सचिन गवळी यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाची ही एक आरोग्य योजना आहे, जी राज्यातील सर्व कुटुंबांना परवडणाऱ्या आरोग्य सेवा पुरवते. या योजनेत, प्रति कुटुंब प्रति वर्षी 5 लाख आरोग्य संरक्षण, तसेच महाराष्ट्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते. ही योजना सर्वसमावेशक असून, विविध प्रकारच्या आजारांवर उपचार, शस्त्रक्रिया आणि आवश्यक वैद्यकीय सेवा यांमध्ये मदत करते. 
       यावेळी डॉ. सचिन गवळी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सांगोला येथील दिशा हॉस्पिटलमध्ये पूर्वीपासूनच मुख्यमंत्री साह्यता निधी योजना सुरू असून या योजनेअंतर्गत सांधा रोपण शस्त्रक्रिया साठी निधी, सर्व मेडिक्लेम कॅशलेस सुविधा असून या हॉस्पिटल मध्ये सर्व प्रकारच्या फॅक्चर, अॅक्सिडेंट आणि ट्रॉमा केअर,
आर्थोस्कोपी (खांदा, गुडघा निसटणे उपचार) प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम सांधारोपण शस्त्रक्रिया (T.H.R.,T.K.R.) स्पइन सर्जरी, जबड्याची शस्त्रक्रिया, मणक्याचे सर्व आजाराचे निदान व उपचार केले जातात असेही सांगितले

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart