Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, २ जानेवारी, २०२६

कडलास जिल्हा परिषद गटाची निवडणुकीच्या अनुषंगाने वाटंबरे येथे बैठक संपन्न!.

विविध विकास कामाचे पूजन व कडलास जिल्हा परिषद गटाची निवडणुकीच्या अनुषंगाने वाटंबरे येथे  बैठक संपन्न!.



आज आनंद मंगल कार्यालय, वाटंबरे येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवार आणि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुखांचा कार्यकर्ता ही बैठक *भाजप जिल्हाध्यक्ष श्री चेतनसिंह केदार-सावंत* यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 



या बैठकीदरम्यान, पक्षसंघटना अधिक सशक्त करण्यावर भर देण्यात आला.तसेच बूथ पातळीवर नियोजनबद्ध कामकाज राबवणे आणि प्रत्येक मतदारापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला. निवडणूक काळात प्रभावी संपर्क, एकजूट आणि पक्षवाढीसाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी श्री. बाळासाहेब एरंडे, श्री. शिवाजी गायकवाड, श्री. बाळाप्पा येलपले, श्री. जयंत केदार, श्री. सचिन देशमुख, श्री. बाळासाहेब काटकर, श्री. मधुकर पवार, श्री. नंदकुमार दिघे, श्री. विजय बाबर, नगरसेविका सौ. सुजाताताई केदार-सावंत, सौ. तनुजाताई एरंडे, नगरसेविका सौ. शोभाताई फुले, सौ. मंगलताई पवार, श्री. लक्ष्मण येलपले, श्री. आण्णासाहेब केदार-सावंत, श्री. शिवाजी ठोकळे, श्री. अनिल केदार-सावंत, श्री. सुभाष पवार, श्री. मोहन पवार, श्री. निकम सर, श्री. दत्ता पवार इ मान्यवर भाजप पदाधिकारी कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart