कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडी सोहळ्याचे शिंगणापूर कडे प्रस्थान*
*कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडी सोहळ्याचे शिंगणापूर कडे प्रस्थान*
*
कोळेकर महास्वामी च्या मार्गदर्शनाखाली हजारो भाविक दिंडीत सामील*
नाझरे प्रतिनिधी
करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या दर्शनासाठी कोळेकर महास्वामीच्या मार्गदर्शनाखाली हजारो भाविकांचे कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडी सोहळ्याचे कोळे ता. सांगोला मठातून शिंगणापूर कडे प्रस्थान झाले आहे.
सदर दिंडी सोहळ्यात उत्तराधिकारी गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महाराज त्याचबरोबर म्हासोळीकर महाराज, महादेव महाराज हिंगणगाव, रेखा शिंदे सोमेश्वर देवस्थान हातीद, वीरभद्र देवस्थान नाझरे, रुद्र पशुपती दिंडी केमवाडी इत्यादींचा सहभाग असून, शेटफळे ता. आटपाडी येथे दिंडीचे स्वागत, वीरशैव समाजातर्फे करण्यात आले. यावेळी भजन व महास्वामी ची पूजा, महाआरती शिवभक्त नंदकुमार जवळे, सो मनीषा जवळे, सो कोमल जवळे यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
सोमवार 15 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता आटपाडी येथे दिंडीचा मुक्काम व मंगळवार 16 एप्रिल रोजी दुपारी दिघंची व सायंकाळी राजेवाडी मुक्काम होईल. दिनांक 17 एप्रिल रोजी मसवड येथे दुपारी व सायंकाळी मार्डीस मुक्काम होईल. गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी मार्डी मधून दिंडी सोहळ्याचे शिखर शिंगणापूर कडे प्रस्थान होणार आहे. या दिंडी सोहळ्यात महास्वामींचे प्रवचन, भजन, किर्तन होणार आहे. तसेच 18 एप्रिल ते 20 एप्रिल अखेर श्री क्षेत्र शिंगणापूर येथे परम रहस्य ग्रंथाचे पारायण व्यासपीठ चालक सौ जयश्री शीलवंत राहतील. व 19 एप्रिल रोजी दयानंद नागापल्ली यांचे कीर्तन व 20 एप्रिल रोजी पारायण समाप्ती व प्रसादाचे कोळेकर महास्वामी चे किर्तन होईल तरी शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान दिंडी सोहळ्यातर्फे करण्यात आले आहे.



No comments