Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

वाटंबरे येथे तरसाचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट

 वाटंबरे येथे तरसाचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट



वाटंबरे (प्रतिनिधी) – सांगोला तालुक्यातील वाटंबरे गावामध्ये मंगळवारी तरस प्राणी दिसल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली . वाटंबरे निजामपूर रोडवरील कॅनॉल च्या बाजूला उसाच्या शेतात हा  प्राणी तेथील नागरिकांनी पाहिला. काही वेळ तो शेतामध्ये हिंडताना दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

तरसाने या ठिकाणी कोणत्याही जनावरांवर किंवा मनुष्यावर हल्ला केला नसल्याची माहिती मिळत आहे. परंतु हा प्राणी दिसल्यामुळे या भागातील नागरिक भयभीत झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी एकत्र येऊन प्राण्याचा शोध घेतला; मात्र तरस झुडपातून पसार झाला.

वन विभागाने तात्काळ येऊन या प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वाटंबरे ग्रामस्थातून केली जात आहे. 


चौकट:

या घटनेची माहिती आम्ही फोनवरुण वनविभागाला कळविले  असून, तात्काळ वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तरच या प्राण्याला जेरबंद करावी असी आम्ही मागणी केली आहे आहे. 

सरपंच

नामदेव पवार.


No comments