Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज प्रशालेत बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी.

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज प्रशालेत बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी.


 [श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वाटंबरे प्रशालेचा  100% निकाल]

 वाटंबरे /प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा पुणे विभागीय शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा फेब्रुवारी /मार्च 2024 चा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता शिक्षण विभागाच्या अधिकृत सांकेतिक स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला या परीक्षेमध्ये श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वाटंबरे प्रशालेचा निकाल 100% लागला असून सालाबाद प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.


 

यावेळी कु. गौरी विजय पवार या विद्यार्थिनींने 86.83% गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला कु. प्रतीक्षा पोपट पवार या विद्यार्थिनीने 80.50% गुण मिळवून प्रशालेत द्वितीय क्रमांक मिळवला कु. शीतल नवनाथ पवार या विद्यार्थिनीने 79.50% गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक मिळवला. प्रशालेतील  05  विद्यार्थी विशेष प्राविण्य 16 विद्यार्थी प्रथम श्रेणी व  11 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.

  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्या ,  पर्यवेक्षक, शिक्षक  व. शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.


No comments