कडलास पंचायत समिती गणातून नाना बापू यांची शिवसेनेतून उमेदवारीची मागणी.
वाटंबरे | प्रतिनिधी
कडलास पंचायत समिती गणातून आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेतून नाना बापू यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी वाटंबरे परिसरातील शिवसैनिक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. नाना बापू यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विकास सेवा सोसायटीचे चेअरमन पद भूषवले आहे . सामाजिक, राजकीय तसेच विकासात्मक कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे.
गावातील जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नाना बापू यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, तेच कडलास पंचायत समिती गणाचे प्रभावी नेतृत्व करू शकतील, असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या नाना बापू यांना उमेदवारी दिल्यास पक्षाला निश्चितच मोठे यश मिळेल, असा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे वाटंबरे येथील सर्व शिवसैनिक त्यांच्या उमेदवाराच्या मागणीसाठी भेटणार आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा