Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

अपघात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अपघात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३० डिसेंबर, २०२५

अनकढाळ येथे स्विफ्ट मारुती कार पलटी : दोघांचा मृत्यू ,तिघे जखमी.


अनकढाळ येथे स्विफ्ट मारुती कार पलटी : दोघांचा मृत्यू ,तिघे जखमी.

वाटंबरे/प्रतिनिधी:

रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती सांगोला तालुका अनकढाळ टोल नाका येथील बंडगर पाटी या ठिकाणी मारुती स्विफ्ट डिझायर कार पलटी झाल्याने कार मधील दोघेजण मृत्युमुखी व तिघेजण जखमी झाल्याची घटना सोमवार दि. 29 डिसेंबर रोजी घडली. 
खालील घटनेचे सविस्तर वृत्त असे की तेलंगणा राज्यातील (प्रशांती नगर कौतुकुडू) येथील अल्ताफ शफि शेख वय(22) येथील रहिवाशी असून ते व त्याचे मित्र गरीगा पवनकुमार, रेहान महमद, अलीम महमद, आरफान आण्णा रेड्डी, सय्यद समृद्धीन तौशन कुमार, शिवशंकर रेड्डी , इमरान शेख , गौतम असे सर्वजण मित्र दोन गाड्यांमध्ये गोवा येथे पर्यटनासाठी गेले होते. गोवा येथून पर्यटन करून तेलंगणाकडे येताना अनकाढाळ टोल नाक्याजवळ सोमवार दि. 29 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजुन 30 मिनिटाच्या सुमारास अल्पोपहार घेऊन निघालो होते. आय टेन या गाडीमध्ये काही मित्र बसले दुसरी स्विफ्ट डिझायर गाडी नं. TS-35-G-1906 या गाडीमध्ये शरिफ पवनकुमार, रेहान महमद, अलीम महमद, आरिफान आण्णा रेड्डी, सय्यद खमरुद्दीन असे बसून निघाले होतो.
स्विफ्ट डिझायर गाडी हा सय्यद खमरुद्दीन चालवत होता. त्यातली एक गाडी पुढे गेली होती त्यांना रात्री 02.00 वा. सुमारास सोबत असलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीचा अपघात झाला आहे असा फोन आला. तेव्हा त्यानी परत येऊन पाहिले असता स्विफ्ट डिझायर गाडी नं. TS-35-G-1906 ही अनकढाळ टोल नाक्याच्या पुढे बंडगर पाटीच्या जवळ खड्ड्यात पलटी होऊन अपघात झालेला दिसून आला या वेळी गाडीतील जखमी झालेले दिसून आले.
यावेळी अपघातातील सर्व जखमींना राष्ट्रीय महामार्गाच्या ॲम्बुलन्सने सोलापूर येथील सी एन एस या हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले त्यात पवनकुमार व्यंकटेश कुमार गरीगा वय 22 राहणार कोली लाईन कौतुगुडम व रेहान मोईन महमद वय 20 वर्षे रा. नसरापूर जिल्हा मेधक राज्य तेलंगणा हे उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .
अलीम महमद, आरिफान आण्णा रेड्डी, सय्यद खमरुद्दीन यांच्यावर खंडागळे हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरता सीएनएस हॉस्पिटल सोलापूर येथे घेऊन गेल्याचे समजले आहे. अल्ताफ शेफी शेख यांनी या अपघाताची नोंद सांगोला पोलीस स्टेशनला केली आहे. या अपघाताचा पुढील तपास सांगोला पोलीस स्टेशन करत आहेत.

शुक्रवार, १९ डिसेंबर, २०२५

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील महिला ठार; दोघे जखमी



अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील महिला ठार; दोघे जखमी



वाटंबरे (प्रतिनिधी) :

अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत मोटारसायकलवर प्रवास करणाऱ्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 19 फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील रत्नागिरी–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अनकढाळ टोलनाक्याजवळ बंडगर पाटी परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकल क्रमांक MH-45 AA 7616 वरून बाळासाहेब कांबळे (वय 48), प्रियांका मुकुंद बागव (वय 30) व श्रेया मुकुंद बागव (वय 3) हे तिघे नाझरे येथील रहिवासी आपल्या गावी नाझरेकडे जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रियांका बागव या रस्त्यावर फेकल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाळासाहेब कांबळे व चिमुकली श्रेया बागव हे दोघे गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस, हायवे पेट्रोलिंग कर्मचारी व सांगोला पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी त्याच रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

एसटीने पाठीमागून धडक दिल्याने अनकढाळ येथील बाबासाहेब बंडगर यांचा जागीच मृत्यू.

एसटीने पाठीमागून  धडक दिल्याने अनकढाळ येथील बाबासाहेब बंडगर यांचा जागीच मृत्यू.



सांगोला- भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने पाठीमागून स्कुटीला जोराची धडक दिल्याने अपघातात गंभीर जखमी झालेल्या ५४ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.हा अपघात काल मंगळवारी दुपारी २:१५ च्या सुमारास सांगोला- मिरज हायवे वरील कमलापूर (अनुसे मळा ) या ठिकाणी घडला. बाबासाहेब कृष्णा बंडगर -५४ रा.अनकढाळ ता. सांगोला असे मृताचे नाव आहे. याबाबत, दत्तात्रय सत्यवान बंडगर रा.सदर यांनी फिर्याद दिली पोलिसांनी एसटी चालक संतोष दिनकर खोपकर रा. धबधबेवाडी ता. पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला. 


 अनकढाळ ता सांगोला येथील मृत बाबासाहेब बंडगर हे मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास त्यांच्या एम एच-०३ एव्ही- ३६५३ या स्कुटी वरून सांगोला ते मिरज हायवेने अनकढाळ घराकडे निघाले होते त्यादरम्यान सांगोला येथून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एम एच १४-एम एच -१३५७ एसटी बसने कमलापूर (अनुसे मळा ) कॉर्नरला पुढील सदर स्कुटीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातात स्कुटीवरील बाबासाहेब बंडगर हे उडून रोडच्या कडेला असलेल्या लोखंडी कठड्यावर जाऊन पडल्याने गंभीर जखमी झाले त्यादरम्यान नेमके पाठीमागून दत्तात्रय बंडगर व बापूराव सुरवसे असे दोघेजण मिळून एम एच १०-ईबी-३०३३ या स्कार्पिओ मधून अनकढाळ गावाकडे जात असताना त्यांनी अपघात झाल्याचे पाहून त्यांची कार थांबवली. अपघातातील जखमी ओळखीचे बाबासाहेब बंडगर असल्याने त्यांना उपचार करता त्याच स्कार्पिओ मधून सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले.

सोमवार, २१ जुलै, २०२५

वाटंबरे येथे चारचाकी कारचा व एस.टी. बसचा भीषण अपघात : नाझरे येथील दोन युवक ठार

 .वाटंबरे येथे चारचाकी कारचा व एस.टी. बसचा भीषण अपघात : दोन ठार 



वाटंबरे /प्रतिनिधी : रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती वाटंबरे मान नदीच्या नजदीक तुळजापूर आगाराच्या तुळजापूर कोल्हापूर एसटीचा व चार चाकी कारचा भीषण अपघात घडला या अपघातात कार मधील दोघेजण जागीच ठार झाले तसेच एसटीच्या ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली इतर प्रवासी जखमी झाले. 

तुळजापूर आगाराची (एम एच २० बी एल 42 26) एसटी तुळजापूरहून कोल्हापूर कडे जात असताना वाटंबरे मान नदीच्या नजदीक भरगाव वेगाने नाझरे या ठिकाणाहून सांगोलकडे जाणाऱ्या कारने डिव्हायडेड तोडून विरुद्ध बाजूने येत असलेल्या एसटीला धडक दिली. यात कार मधील राहुल आयवळे, संदेश हेगडे (नाझरे) या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा या अपघातात चक्का चूर झाला तसेच एसटी चालक मुकुंद गोरखपुरी गंभीर जखमी झाला तसेच प्रवासी पूजाबाई कारभारी वाघमारे व ईतर प्रवासी जखमी झाले . घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. राष्ट्रीय महामार्ग कर्मचारी व राष्ट्रीय महामार्ग पोलीस पीएसआय भिंगारदेव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन या ठिकाणी जमा झालेल्या नागरिकांना हटवून वाहनांना रस्ता मोकळा करून दिला. 


अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र वेग व रस्त्यावरील गाडी नियंत्रण गमावल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाकडून प्रवाशांना सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







‼️‼️‼️‼️‼️‼️

📡*Khabardar News* 

🔰बातमी जाहिरातीसाठी.

🔰संपर्क: दत्तात्रय पवार.

 📱मो: *8007913668* 

📡📡📡📡📡📡

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart