Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

निवड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निवड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १४ डिसेंबर, २०२५

सांगोला तालुका भाजपच्या सरचिटणीसपदी सिद्धेश्वर गाडे यांची निवड

सांगोला तालुका भाजपच्या सरचिटणीसपदी  सिद्धेश्वर गाडे यांची निवड



सांगोला : सांगोला तालुका भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीसपदी सिद्धेश्वर गाडे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या तालुका संघटनेतील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून, त्यामध्ये गाडे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
  सिद्धेश्वर गाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाशी सक्रियपणे कार्यरत असून त्यांनी तालुका पातळीवर पक्षाच्या संघटनात्मक कामात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी भाजपचे कार्यालयीन प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत पक्षाचे दैनंदिन कामकाज, कार्यकर्त्यांशी समन्वय तसेच विविध कार्यक्रमांचे नियोजन यशस्वीपणे पार पाडत आहेत.
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर बोलताना सरचिटणीस सिद्धेश्वर गाडे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या संघटनात्मक बांधणीसाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. यापुढे तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीपर्यंत पक्ष पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन संघटन अधिक मजबूत करणार आहे. नव्या कार्यकर्त्यांना जोडणे, युवकांना संधी देणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे यावर भर राहील.”
तालुक्यात भाजपची संघटना अधिक बळकट करण्यासाठी बूथ पातळीवरील रचना मजबूत करणे, महिला व युवक आघाड्यांचे कार्य सक्रिय करणे यासाठी पाठपुरावा करेन असे त्यांनी सांगितले. गाडे यांच्या निवडीमुळे सांगोला तालुक्यात भाजपच्या संघटनात्मक कामाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


सोमवार, १४ जुलै, २०२५

चोपडी येथील सुयश शंकर बाबर यांची सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता श्रेणी-२ पदावर निवड

चोपडी येथील सुयश शंकर बाबर यांची सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता श्रेणी-२ पदावर निवड 
* विविध प्रकारच्या परीक्षेतून सुयश बाबर यांची इतर ४ पदावर निवड
सांगोला /प्रतिनिधी: चोपडी 
 गावचे सुपुत्र सुयश शंकर बाबर यांची सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता श्रेणी- २ या पदावर निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2023 मध्ये घेतलेल्या(MES- 2023) परीक्षेत त्यांनी हे सुयश संपादन केले आहे. सुयश बाबर यांचे प्राथमिक शिक्षण गणेशनगर चोपडी , माध्यमिक शिक्षण बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोपडी , बारावी पर्यंतचे शिक्षण आबासाहेब खेबुडकर जुनिअर कॉलेज आटपाडी, पदवीपर्यंतचे शिक्षण शासकीय कॉलेज अवसारी पुणे येथे पूर्ण केले . पदवीनंतर विविध प्रकारच्या परीक्षेच्या माध्यमातून त्यांची इतर ४ पदावरती निवड झाली आहे.
       सुयश बाबर यांची इतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुणे विभागात जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर निवड , जिल्हा परिषद सांगली येथे कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर निवड झाली आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग बांधकाम विभाग येथे कनिष्ठ अभियंता पदावर ते‌ कार्यरत आहेत . 
सुयश बाबर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या (MES 2023) या परीक्षेत सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता श्रेणी २ या पदावर निवड झाली आहे. सुयश बाबर यांचे वडील एस. बी. बाबर सर हे बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोपडी येथे मुख्याध्यापक- प्राचार्य पदावर कार्य होते. स्पर्धा परीक्षेसाठी त्यांना वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सुयश बाबर यांच्या निवडीबद्दल सर्व क्षेत्रातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

रविवार, ६ जुलै, २०२५

राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी श्री.संतोष लांडे यांची पदोन्नती

राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी श्री.संतोष लांडे यांची पदोन्नती 

प्रतिनिधी-  

  युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गणेश कचकलवार यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.गणेश महाडिक यांच्या हस्ते तसेच पश्चिम महाराष्ट्र उपविभाग प्रमुख श्री.कांताभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली . पुणे जिल्हा उपाध्यक्ष.श्री गोपाळ भालेराव यांच्या शिफारसीने श्री. संतोष लांडे. यांची राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या . पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी पदोन्नती करण्यात आली. असून श्री संतोष लांडे यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे आभार मानले व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुढील कार्यकारिणीस पुढील कामास तत्पर हजर राहून कार्य जोमाने करण्याचे आश्वासन दिले. युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी श्री. संतोष लांडे यांची पदोन्नती झाल्या बद्दल. सामाजिक. राजकीय. शैक्षणिक. पत्रकारिता क्षेत्रातून शुभेच्छाचा वर्षाव होत. आहे

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart