Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६

चोपडी येथील संग्राम बाबर यांच्या शेतात ॲग्रोस्टार या कंपनीचा 1233 या मका वाणाचे प्रात्यक्षिक संपन्न

 चोपडी येथील संग्राम बाबर यांच्या शेतात ॲग्रोस्टार या कंपनीचा 1233 या मका वाणाचे प्रात्यक्षिक संपन्न 

 * प्रात्यक्षिकासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त    प्रतिसाद-

*ॲग्रोस्टार कंपनीच्या बियाणे व औषधांच्या वापराबाबत तेजस कोल्हे यांचे मार्गदर्शन संपन्न 



सांगोला /प्रतिनिधी:( दशरथ बाबर )  शेती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पुण्यातील नामवंत ॲग्रोस्टार कंपनीच्या 1233 या मका वाणाचे पीक प्रात्यक्षिक चोपडी तालुका सांगोला येथील प्रगतशील शेतकरी संग्राम बाबर यांच्या शेतामध्ये शनिवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाले. ॲग्रोस्टार कंपनीचे कृषी मार्गदर्शक तेजस कोल्हे यांनी चोपडी येथील शेतकऱ्यांना ॲग्रोस्टार 1233 या मका वाणासंदर्भात तसेच कंपनीच्या नवनवीन उत्पादनाबाबत  बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांनीही कंपनी प्रतिनिधींना प्रश्न विचारले व त्याची उत्तरे जाणून घेतली.


शेतकरी संग्राम पांडुरंग बाबर यांनी चोपडी येथील सचिन खळगे यांच्या श्री. गणेश कृषी सेवा केंद्रातून ॲग्रोस्टार 1233 या मका बियाणाची खरेदी केली होती. या मका लागवडीपासून संग्राम बाबर यांना एकरी 30 ते 35 क्विंटल मका उत्पादन अपेक्षित आहे. मकेसाठी पाणी, खत व औषधे याचे उत्कृष्ट नियोजन करून अतिशय चांगल्या प्रकारे मका पीक तयार केले असून लवकरच त्याची कापणी करण्यात येणार आहे.  100 ते 110 दिवसांमध्ये हे मका पीक तयार होते. मक्याचे कणीस वाळले तरी मक्याचे ताट हिरवेगार राहत असल्याने या मकेपासून मुरघासही तयार करता येते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कंपनीने तयार केलेल्या ॲग्रोस्टार 1233 व 1235 या मका वाणास व या कंपनीने तयार केलेल्या वेगवेगळ्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांची चांगली पसंती आहे.

ॲग्रोस्टार या कंपनीचे कृषी मार्गदर्शक तेजस कोल्हे यांनी या मक्याच्या उत्पादनासंदर्भात शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी या कंपनीच्या ॲपमध्ये उपलब्ध असलेली माहिती घेऊन आपल्या शेतात वेगवेगळ्या पिकांचे भरघोस उत्पादन घ्यावे असे 

आवाहन केले. टेरिटरी मॅनेजर धिरज शिंदे, ॲग्रोस्टार कंपनीचे सांगोला तालुका प्रतिनिधी गहिनीनाथ यादव यांनीही मार्गदर्शन केले. 

सर्वप्रथम चोपडी गावचे माजी उपसरपंच पोपटशेठ यादव, चेअरमन भिकाजी बाबर, चेअरमन दगडू बाबर, आर. एस. बाबर सर, संग्राम बाबर, सचिन खळगे, यांच्या हस्ते लक्ष्मीमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी चोपडी गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. निवड झालेल्या शेतकऱ्यांना कंपनी उत्पादित मका बियाणे व औषध वाटप करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart