Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सामाजिक उपक्रम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक उपक्रम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २५ जून, २०२५

डॉ. अविनाश खांडेकर, सतीशभाऊ सावंत, ह भ प कृष्णाजी कदम यांना पाचेगाव येथे सत्कार समारंभ व मानपत्र देण्याचा कार्यक्रम .

 डॉ. अविनाश खांडेकर, सतीशभाऊ सावंत, ह भ प कृष्णाजी कदम यांना पाचेगाव येथे सत्कार समारंभ व मानपत्र देण्याचा कार्यक्रम .


 दीपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पाचेगाव खुर्द येथे पायी दिंडीतील वारकऱ्यांना मोफत तपासणी व औषधोपचार : डॉ. राज मिसाळ

 *सांगोला/प्रतिनिधी :*

 दीपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पाचेगाव खुर्द येथे आषाढी एकादशीनिमित्त गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रातून पायी दिंडीत जाणाऱ्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात येणार असून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. अविनाश खांडेकर वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पंढरपूर विभागाचे विभाग प्रमुख सतीशभाऊ सावंत यांची निवड व पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महाराज कीर्तनकार कृष्णाजी कदम यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती दीपक आबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राज मिसाळ यांनी दिली. 

 दीपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पाचेगाव खुर्द येथे सलग पंधरा वर्षे आषाढी वारीनिमित्त दिंडीतील वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात येतात. त्याचबरोबर ग्रामस्थांच्या वतीने चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था केली जाते. चालू वर्षी 30 जून ते 4 जुलै अखेर पाचेगाव खुर्द येथे आषाढी वारीनिमित्त गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रातून पायी चालत जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी दीपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे व पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत औषधोपचारही केले जाणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी डॉ. अविनाश खांडेकर यांची तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पंढरपूर विभागाच्या प्रमुखपदी सतीशभाऊ सावंत व पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार रामाजी महाराज मठ मठाधिपती ह. भ. प. कृष्णाजी कदम ढालगावकर पंढरपूर यांचा दीपक आबा साळुंखे पाटील चारिटेबल ट्रस्ट व पाचेगाव खुर्द ग्रामपंचायत पाचेगाव विकास सेवा सोसायटी यांच्यावतीने मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे 30 जून रोजी सकाळी 10 वाजता विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा यांच्यासह सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार ऍडव्होकेट शहाजीबापू पाटील माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.


 *चौकट*

 *वारकऱ्यांची मसाज*

 *आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना परभणी मेडिकल कॉलेजच्या श्रावणी हायटेक इन्स्टिट्यूट व ॲक्युपंक्चर या संस्थेच्या वतीने मसाज केली जाणार आहे व वारकऱ्यांचे मसाज करून आयुर्वेदिक वेदनाशामक तेल वाटप केले जाणार आहे अशी माहिती दीपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राज मिसाळ यांनी दिली.*


सोमवार, १२ मे, २०२५

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष खा. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने.

 शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष खा. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने.

डॉ.परेश खंडागळे  व डॉ.स्वाती खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग आरोग्य तपासणी शिबीर व सर्व प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया


सांगोला/प्रतिनिधीः

 महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या एकनाथ हिरक आरोग्य वर्षानिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना मदत कक्ष, खासदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व आरोग्यदुत फाऊंडेशन व खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला तालुक्यातील नामांकित डॉ.परेश खंडागळे व डॉ. स्वाती खंडागळे यांच्या वाढदिवासानिमित्त व लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कडलास रोडवरील खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बुधवार दि. 28 मे, शनिवार 7 जून वबुधवार   9जुलै 2025 रोजी मोफत सर्व रोग निदान शिबीर व सर्व प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.  त्याबरोबर तीन दिवस हॉस्पिटलचे रूग्णाचे एक रूपयाही बिल घेतले जाणार नाही. मोफत हॉस्पिटलमध्ये सुविधा दिल्या जातील. अशी माहिती खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक संचालक डॉ.परेश खंडागळे व डॉ.स्वाती खंडागळे यांनी दिली.


महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख व वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष आरोग्यदुत मंगेशदादा चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर गोरगरीब रूग्णांना अहोरात्र मदत केली जात आहे. महाराष्ट्रातील हजारो रुग्णांचे प्राण मंगेश दादा चिवटे यांनी वैद्यकीय मदत केल्यामुळे वाचलेले आहे राज्याच्या कानाकोपर्‍यामध्ये दररोज मोफत आरोग्य तपासणी शिबीरे व मोफत औषध वाटप केली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या एकनाथ हिरक आरोग्य वर्षानिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना मदत कक्ष, खासदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व आरोग्यदुत फाऊंडेशन व खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला तालुक्यातील नामांकित डॉ.परेश खंडागळे व डॉ. स्वाती खंडागळे यांच्या वाढदिवासानिमित्त व लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कडलास रोडवरील खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बुधवार दि. 28 मे, 7 जून व बुधवार 9 जुलै 2025 रोजी मोफत सर्व रोग निदान शिबीर व सर्व प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्याबरोबर तीन दिवस हॉस्पिटलचे रूग्णाचे एक रूपयाही बिल घेतले जाणार नाही. या शिबीरामध्ये रूग्णांच्या तपासणी व शस्त्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्रातील नामांकित डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत. या शिबीरामध्ये हॉस्पिटलचा एक रूपयाही रूग्णांना खर्च करावा लागणार नाही. सर्व तपासण्या व शस्त्रक्रिया मोफत होणार आहे. यामध्ये सिजिरियन, प्रसुती त्याचबरोबर सर्व फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रिया पुर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. अ‍ॅपेंडिक्स, हरनिया, फिशर, गर्भाशय पिशवी काढणे, मुतखडा, प्रोस्टेट, दुर्बिणीद्वारे काही शस्त्रक्रिया पुर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.  हॉस्पिटलमध्ये मेडिसीन, भुल व रक्ताच्या चाचण्याचा खर्च रूग्णांना करावा लागणार आहे. कान- नाक- घसा या संदर्भातील शस्त्रक्रियामध्येही सवलत दिली जाणार आहे.    


तसेच खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना या योजनेतंर्गत सांगोला शहर व तालुक्यासह आजुबाजुच्या तालुक्यातील गोरगरीब रूग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया कायमस्वरूपी केल्या जात आहेत.आत्ता पर्यंत गेल्या 12 वर्षांमध्ये अनेक मोफत शस्त्रक्रिया व उपचार केले आहेत.त्याच प्रमाणे अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

आत्ता पर्यंत खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉ.परेश खंडागळे व डॉ.स्वाती खंडागळे यांनी जवळपास 800 नॉर्मल प्रसुती मोफत केल्या आहेत. व गोरगरीब रुग्णांना कमीत कमी दरात उपचारही केलेले आहेत

बुधवार दि. 28 मे, शनिवार 7 जून व बुधवार 9 जुलै 2025 या तिन्ही दिवशी खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मोफत आरोग्य तपासणी, सर्वरोग निदान तपासणी तसेच सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया पुर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. त्यामुळे सांगोला शहर व तालुक्यासह आजुबाजुच्या तालुक्यातील गोरगरीब रूग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.परेश खंडागळे व डॉ. स्वाती खंडागळे यांनी केले आहे.


महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील  उपमुख्यमंत्री ना, एकनाथ शिंदे साहेब यांच्या एकनाथ हिरक आरोग्य वर्षानिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ,खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन व आरोग्य दूत फाउंडेशन यांच्या वतीने सांगोला शहरांमध्ये भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर औषध वाटपही व चष्मे वाटप महा आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा, एकनाथ शिंदे साहेब यांनी करून सांगोल्या मध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची व खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन ची स्थापना करण्याचे घोषित केले होते पंढरपूर विभागाच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या प्रमुख पदी सतीश सावंत यांची निवड मा,एकनाथ शिंदे साहेब खासदार श्रीकांत शिंदे व उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक व शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आरोग्य दूत मंगेश दादा चिवटे   साहेब यांनी केली आहे सतीश सावंत यांचे काम युद्ध आरोग्याच्या संदर्भात युद्ध पातळीवर सुरू आहे लवकरच सांगोला शहरांमध्ये वैद्यकीय मदत कक्षा चे कार्यालय सुरू करण्यात येणार असून 24 तास रुग्णांच्या सेवेसाठी हा मदत कक्ष उपलब्ध असल्याची व रुग्णांना वैद्यकीय मदत 24 तास करणार असल्याची शिवसेने वैद्यकीय मदत कक्षाचे पंढरपूर विभागाचे प्रमुख सतीश सावंत यांनी सांगितले

 

गुरुवार, २१ मार्च, २०२४

आर. के. बहुउद्देशीय संस्था आणि स्पार्क मिंडा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना मोफत साहित्य वाटप.

 आर. के. बहुउद्देशीय संस्था आणि स्पार्क मिंडा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना मोफत साहित्य वाटप. 

पुणे /प्रतिनिधी :दिव्यांग म्हणजे त्यांच्यामध्ये एखादी दिव्यशक्ती असते आणि ते त्यांच्या लक्षात न आल्यामुळे हे दिव्यांग स्वतःला मागे पडतात. आणि आपल्याला काहीतरी कमी आहे या विचाराने त्यांच्यामध्ये विश्वास कमी होतो. परंतु दिव्यांग म्हणजेच त्यांच्यामध्ये एक चांगला गुणही असतो, आज त्यांना आर. के. बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आणि स्पार्क मिंडा यांच्या वतीने वाकर कुबडी, काठी अशा काही वस्तू त्यांना मोफत देण्यात आल्या.
 जेणेकरून त्यांचे पुढील भविष्य हे ते स्वतःच्या पायावर उभा राहून आणि एका आत्मविश्वासाने जगतील हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
    या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष आनंद साळुंखे प्रणव साळुंके भाग्यश्री साळुंके, नगरसेवक अविनाश बागवे, कृषी तज्ञ बुधाजीराव मुळीक सर, स्पार्क मिंडा फाउंडेशनच्या वतीने मृणाली कलकोटवार. 

महाराष्ट्र ऑडिटर संघटनेचे अध्यक्ष रामदास शिर्के, झेप फाउंडेशन पुणे( महाराष्ट्र राज्य) संस्थापक/ अध्यक्ष, दैनिक वृत्तपत्र बाळकडू पत्रकार कांता (भाऊ) राठोड, महा एनजीओ फेडरेशन चे चेतन शर्मा,पुना कॉलेजचे बाबा शेख आणि नसरुद्दीन सर इ. उपस्थित होते

गुरुवार, १८ जानेवारी, २०२४

हॉटेल पांडेजी यांनी स्वखर्चाने माणकेश्वर मंदिरात बोअरवेल मारत भावीक भक्तासाठी केली पाण्याची सोय.

हॉटेल पांडेजी यांनी स्वखर्चाने माणकेश्वर मंदिरात बोअरवेल मारत भावीक भक्तासाठी केली पाण्याची सोय.

वाटंबरे /प्रतिनिधी: सांगोला तालुका वाटंबरे या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक मध्ये प्रसिद्ध असलेले तसेच गोवा ,सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी कर्नाटक,कोकण मधील वारकऱ्यांमध्ये मुक्कामासाठी प्रसिद्ध असलेले जागृत खंडोबा देवस्थान व माणकेश्वर मंदिरामध्ये पंढरपूरला वारीच्या निमित्ताने जात असताना दिंड्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवते या पाण्याची टंचाई लक्षात घेता वाटंबरे येथील रत्नागिरी नागपूर हायवे वरील पर राज्यातून येऊन हॉटेल व्यवसायात उत्तम भरारी घेणारे हॉटेल पांडेजी यांनी ही अडचण लक्षात घेऊन त्यांनी माणकेश्वर मंदिर या ठिकाणी स्वखर्चाने बोअरवेल मारत खंडोबा देवस्थान व माणकेश्वर मंदिरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी तसेच वारकऱ्यांसाठी ग्रामस्थांसाठी पाण्याची सोय करून दिली.
त्यानी केलेल्या या कामाचे वाटंबरे ग्रामस्थ तसेच भाविक भक्तांमधून त्यांचे स्वागत केले जात आहे.

गुरुवार, २ मार्च, २०२३

माझ्या परिघात सेवा समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या माईंडफुलनेस या एक दिवसाच्या कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद.

आनंदी भरीन तिने लोक ही प्रतिज्ञा घेऊन कार्य करीत असलेल्या माझ्या परिघात सेवा समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या माईंडफुलनेस या एक दिवसाच्या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. यासाठी मुंबईहून आकाशवाणी निवेदक मा.  उमेश घळसासी हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सदर कार्यशाळा शिक्षक  सोसायटीच्या सभागृहामध्ये सांगोला येथे  मंगळवार  दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत पार पडली. 
         यावेळी प्रतिकूल परिस्थितीत देखील मानसिक शांती कायम ठेवून सक्रिय राहणे.
 राग,भीती,चिंता योग्य वेळी योग्य प्रकारे व्यक्त करण्याची क्षमता प्राप्त करणे, सह अनुभूती विकसित करून नाते संबंध दृढ करणे, स्वतःला आणि इतरांना प्रेरित करणे, आनंदी वातावरण निर्माण करणे, मानसिक तणाव योग्य पातळीवर ठेवून आयुष्याला अर्थ प्राप्त करून घेणे, नकारात्मक भावना आणि भीतीदायक विचार यांचा त्रास कमी करणे, मनाची चंचलता कमी करणे, स्मृती विकसित करणे इत्यादी विषयांचे तंत्र विवेचन,प्रात्यक्षिक, प्रश्नोत्तरांचा समावेश होता.
 याप्रसंगी .आयुब पटेल, डॉ. राजेंद्र सूर्यवंशी,श्री.रणजित जगताप,श्री.बसवेश्वर
 झाडबुके,श्री.योगेश कांबळे, श्री.निसार तांबोळी(पत्रकार), दादासाहेब केदार, श्री. एस. के. पाटील डॉ. गौरव माने, श्री. तानाजी आळतेकर श्री.शरद इंगवले, श्री. राजू राऊत, सौ.उषा गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.

 अमोल गायकवाड,भारत मेटकरी, संजय गव्हाणे, संतोष नरळे, सतीश येलपले, अतुल उकळे, आण्णासो गायकवाड,
अतुल वाघमोडे,अविनाश कुलकर्णी,दयानंद बनकर,सुभाष भंडगे यांचे सहकार्य लाभले.

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart