वाटंबरे करांनी केली अनिष्ट विधवा प्रथा निर्मूलनाची होळी.
वाटंबरे करांनी केली अनिष्ट विधवा प्रथा निर्मूलनाची होळी.
{धनवडे परिवार , ग्रामपंचायत ,महिला व बालविकास प्रकल्प, डॉ. आंबेडकर शेती विकास संशोधन संस्था यांच्या मार्फत घटनास्थळी अंमलबजावणी}
वाटंबरे/प्रतिनिधी: सांगोला तालुका गटविकास अधिकारी आनंद लोकरे, सांगोला महीला बाल विकास प्रकल्प अधिकारी आसमा आतार व विस्तार अधिकारी टकले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका सरस्वती आदलिंगे , महालक्ष्मी देशमुख तसेच आंबेडकर शेती व संशोधन संस्था यांच्या पदाधिकारी कल्पना मोहिते यांच्या पुढाकाराने सांगोला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये परंपरेने चालत आलेल्या अन्यायकारक, अनिष्ट विधवा प्रथेच्या निर्मूलनासाठी ग्रामसभेचे ठराव करण्यात आले होते. या प्रथेच्या विरोधात वाटंबरे ग्रामसभेत ठराव मंजूर केला गेला होता.वाटंबरे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण धनवडे यांचे दि.१२ डिसेंबर २०२२ सोमवारी अपघाती निधन झाले होते त्यांचा दि.१४ डिसेंबर २०२२ बुधवारी तिसऱ्या दिवसाचा विधीचा कार्यक्रम होता. परंपरेने चालत आलेल्या अन्यायकारक अनिष्ट विधवा प्रथेच्या निर्मूलनासाठी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत सदस्य सुकेशनी धनवडे, अंगणवाडी सेविका वैशाली पवार, अस्मिता धनवडे याना त्यांच्या परिवारा सोबत चर्चेसाठी पाठवले या चर्चेला त्यांच्या कुटुंबीयांकडून तसेच समाज बांधवाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
सांगोला पंचायत समिती व वाटंबरे ग्रामपंचायत यांच्या वतिने नारायण धनवडे यांच्या तिसऱ्या दिवसाच्या विधी दिवशी नारायण धनवडे यांना श्रद्धांजली वाहून विधवा महिलांच्याअन्यायकारक जुन्या रूढी परंपरेला फाटा देत त्यांच्या पत्नी लक्ष्मी नारायण धनवडे यांची पंचायत समिती मधील महिला अधिकारी , वाटंबरे गावचे उपसरपंच, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेविका व सर्व महिलांच्या हस्ते त्यांची खणा नाराळाने ओटी भरण्यात आली. नारायण धनवडे यांच्या सर्व मृत्यूचा विधी त्यांच्या मुलीने केल्यामुळे त्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती विकास संशोधन संस्थेच्या पदाधिकारी कल्पना मोहिते व महिला व बाल विकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका सरस्वती आदलिंगे यांनी वाटंबरे करांनी घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयाचे त्यांनी स्वागत केले, विधवा महिलांना समाजामध्ये सन्मानाने जगण्याचा हक्क आहे त्यांना तो मिळालाच पाहिजे यावेळी त्यांनी नारायण धनवडे यांच्या पत्नीच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे राहू असे सांगितले. यावेळी वाटंबरे ग्रामसेवक एस, आर, मोहिते यांनीही पंचायत समिती व वाटंबरे ग्रामपंचायत यांच्या चर्चेला धनवडे कुटुंबीयांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी घेतलेल्या या निर्णयाच्या त्यांनी स्वागत केले .
या वेळी विधवा महिलांचा सन्मान करुया' ही शपथ घेण्यात आली.
या कार्यक्रमाला वाटंबरे ग्रामपंचायत सरपंच किरण पवार ,उपसरपंच मोनिका निकम, ग्रामसेवक एस ,आर, मोहिते तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी व मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थ व तिसऱ्या दिवसाचे विधीसाठी आलेले सर्व नातेवाईक यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विनोद धनवडे यांनी केले.







No comments