राज्य दैनिक वृत्तपत्र बाळकडूच्या पुणे जिल्हाप्रमुख पदी कांता( भाऊ) राठोड यांची निवड.
राज्य दैनिक वृत्तपत्र बाळकडूच्या पुणे जिल्हाप्रमुख पदी कांता( भाऊ) राठोड यांची निवड.
वाटंबरे/प्रतिनिधी:दि. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी बाळकडू दैनिक वृत्तपत्राचे संपादक दीपक खरात गुरुजी यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरातून जिल्हाप्रमुख , उपजिल्हाप्रमुख, व विधानसभा प्रमुख पदाची नियुक्ती जाहीर केली यामध्ये पुणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी कांता (भाऊ) राठोड यांना देण्यात आली.
कांता (भाऊ) राठोड हे सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे ते बाळकडू वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत होते त्यांची जिद्द, चिकाटी, बाळकडू वृत्तपत्रा विषयी त्यांचे प्रेम, व आपलेपणा, जिव्हाळा, व कामातील कायम सातत्यपणा या सर्व गोष्टींचा विचार करून पुणे जिल्हा पत्रकारांच्या सांगण्यावरून संपादक दीपक खरात गुरुजी यांनी त्यांच्यावर पुणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे.
कांता (भाऊ )राठोड हे पत्रकारी ते बरोबर ते पुण्यामध्ये सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे ते झेप फाउंडेशन पुणे( महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक/ अध्यक्ष , आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना व माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष आहेत ते झेप फाउंडेशनच्या व पत्रकार क्षेत्राच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम करतात व लोकांच्या अडचणी चे निवारण करण्यासाठी नेहमी तत्पर असतात.
यावेळी त्यांनी संपादक दीपक खरात गुरुजींनी पुणे जिल्हा प्रमुख पदाची जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडू असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

No comments