Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

वृत्तपत्र विक्रेता संघटनेची कार्यकारणी निवड*

*वृत्तपत्र विक्रेता संघटनेची कार्यकारणी निवड*
सांगोला प्रतिनिधी
             सोलापूर वृत्तपत्र विक्रेता संघटना दत्त चौक सेंटर येथील वृत्तपत्र विक्रेत्यांची बुधवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी 
श्रीराम मंदिर येथे बैठक आयोजित केली होती .
या बैठकीमध्ये संघटनेच्या अध्यक्षपदी सनद बंडी, उपाध्यक्षपदी राजेश श्रीमल तर सचिवपदी प्रकाश मठ यांची
सर्वानुमते निवड करण्यात आली .
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शिवलिंगआप्पा मेढेगार हे होते ,तर प्रमुख उपस्थिती बार्शी संघटनेचे अध्यक्ष सचिन बाबर 
तसेच महाराष्ट्र राज्य संघटनेचे कार्यकारणी संघटनेचे सदस्य , पंढरपूरचे गोरख भिलारे हे उपस्थित होते. 
या बैठकीमध्ये निवड झालेल्या पदाधिकाचा सन्मान शाल, हार पुष्पगुच्छ देऊन
 प्रमुख उपस्थितीच्या हस्ते करण्यात आला.
या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी 
सांगितले की या पुढील काळामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेता संघटना, सोलापूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना ,आसरा सेंटर तसेच दत्त सेंटर हे विक्रेत्यांच्या हितासाठी एकत्र येऊन काम करतील अशा स्वरूपाची ग्वाही दिली.
या बैठकीला आसरा सेंटरचे पदाधिकारी व दत्त सेंटरचे अनेक वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.

No comments