अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील महिला ठार; दोघे जखमी
वाटंबरे (प्रतिनिधी) :
अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत मोटारसायकलवर प्रवास करणाऱ्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 19 फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील रत्नागिरी–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अनकढाळ टोलनाक्याजवळ बंडगर पाटी परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकल क्रमांक MH-45 AA 7616 वरून बाळासाहेब कांबळे (वय 48), प्रियांका मुकुंद बागव (वय 30) व श्रेया मुकुंद बागव (वय 3) हे तिघे नाझरे येथील रहिवासी आपल्या गावी नाझरेकडे जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रियांका बागव या रस्त्यावर फेकल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाळासाहेब कांबळे व चिमुकली श्रेया बागव हे दोघे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस, हायवे पेट्रोलिंग कर्मचारी व सांगोला पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी त्याच रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा