शासनाच्या आदिशक्ती अभियान समितीच्या अध्यक्षपदी बुद्धेहाळ गावच्या रूपाली काळे यांची निवड
शासनाच्या आदिशक्ती अभियान समितीच्या अध्यक्षपदी बुद्धेहाळ गावच्या रूपाली काळे यांची निवड.
सांगोला/प्रतिनिधीः
महिलांच्या समक्षीकरणासाठी शासनाने स्थापन केलेल्या आदिशक्ती अभियान समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या रूपाली संतोष काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राज्यातील महिला व बालकांची मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंख्या व राज्यातील महिलांच्या जीवनात येणार्या समस्या व त्यांच्या सबलीकरणासंदर्भात भेडसावणार्या समस्या ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या अर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीने सन 2025-26 पासून राज्यात आदिशक्ती अभियान राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे महिलांसाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजना/उपक्रम/कार्यक्रम इ. बाबत आवश्यक व उपयुक्त माध्यमाद्वारे प्रचार प्रसिध्दी देऊन जनमाणसांमध्ये याबाबतची जनजागृती करण्यात येईल. यासाठी ग्रामस्तरीय समित्यांना आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे .
ग्राम चळवळीतून महिलांच्या समस्यांचे महत्व जाणून घेणे व महिलांच्या आरोग्य समस्यांचे संवेदनशीलपणे निवारण करणे., कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरीता सक्षम समाज निर्माण करणे., लिंगभेदात्मक विचारसरणीला आव्हान देऊन किशोवयीन मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे व बालविवाह मुक्त समाज निर्माण करणे., ही लैंगिक, शारीरिक अत्याचार ला प्रतिबंध करून हिंसाचार मुक्त कुटुंब व समाज निर्माण करणे व अनिष्ट रुर्डीचे निर्मुलन करणे., महिला नेत्तृत्वाला सक्षम करून पंचायत राज पद्धतीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे., महिला, किशोरी यांना शिक्षण, रोजगार, निर्णय व हक्क यामध्ये समान संधी निर्माण करून शासकीय योजनांचा लाभ व स्वयंरोजगाराच्या संधींच्याचीयमातून आर्थिक उन्नत श्री संकल्पना राबविणे हे या समितीचे काम आहे.
ग्राम सभेने निवडलेली महिला प्रतिनिधी- अध्यक्ष, पुरुष प्रतिनिधी (महिला व बाल विकास क्षेत्रात सक्रिय)- सदस्य, पुरुष प्रतिनिधी सामाजिक क्षेत्रात सक्रिया- सदस्य, आशा स्वयंसेविका- सदस्य, महिला शिक्षिका / महिला तलाठी/महिला पोलीस पाटील- सदस्य, ग्रामसेवकों ग्राम विकास अधिकारी- सदस्य, पोलीस पाटील-सदस्य, अंगणवाडी सेविका-सदस्य सचिव यांचा या समितीत समावेश आहे.

No comments