Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, २४ जून, २०२६

अति मद्यप्राशन केलेल्या ७० वर्षीय इसमाचा वाटंबरे येथे मृत्यू

 अति मद्यप्राशन केलेल्या ७० वर्षीय इसमाचा वाटंबरे येथे मृत्यू




वाटंबरे/प्रतिनिधी -अति मद्य प्राशन केलेल्या ७० वर्षीय वृद्ध इसमास नातेवाईकांनी बेशुद्ध अवस्थेत सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.ही घटना काल बुधवार २४ जून रोजी दुपारी २ च्या सुमारास वाटंबरे ता. सांगोला येथील उबराव मिसाळ यांच्या व्यापारी संकुल समोर

घडली.उत्तम दामोदर नकाते ( वय -७०, रा.अकोला ता सांगोला ) असे मृताचे नाव आहे 

याबाबत, सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा साळे यांनी खबर दिली असून , पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

वाटंबरे ग्रामस्थ गेल्या ४ वर्षापासून गावात अवैध दारू विक्री बंद करावी म्हणून पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत अवैध विक्री व्यवसाय बंद होण्याऐवजी  जोमाने सुरू आहे दरम्यान काल सोमवार काल सोमवार २४ जून रोजी सकाळी ८ वाजता अकोला येथील उत्तम नकाते या वृद्धाने अति मद्यप्राशन केल्याने तो जागीच बेशुद्ध होवून पडला होता या घटनेची माहिती सरपंच नामदेव पवार यांनी पोलीस स्टेशन  , तहसीलदार यांना दिल्याने तहसीलदार बाळूताई भागवत, पोलीस निरीक्षक विनोद घुगे , राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी पंकज कुमार व गडदे यांनी तात्काळ वाटंबरे गावात भेट दिली असता पोलीस अधिकारी यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले यावेळी पुतण्या नितीन नकाते यांनी उत्तम नकाते यांना बेशुद्ध अवस्थेत सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.पुढील तपास पोलीस हवालदार अनिल बनसोडे करीत आहेत.


 (राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सदर घटनेची गंभीर दखल घेऊन वाटंबरे गावात अवैद्य रित्या देशी विदेशी दारू विक्रीत्यावर कारवाई करत  ३२ हजार रुपयेची देशी-विदेशी दारूचा मद्यसाठा जप्त केला.)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart