Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, १९ जून, २०२६

खंडोबा देवस्थान रस्त्यावरील धोकादायक विहिरीला संरक्षण कठडे बसवण्याची नागरिकांची मागणी

 खंडोबा देवस्थान रस्त्यावरील धोकादायक विहिरीला संरक्षण कठडे बसवण्याची नागरिकांची मागणी



वाटंबरे, ता. सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील श्री जागृत खंडोबा देवस्थानाच्या पूर्व द्वाराजवळ, पिंपरी मळ्यालगत रस्त्याच्या कडेला असलेली विहीर सध्या धोकादायक अवस्थेत असून या विहिरीला तातडीने संरक्षण कठडे बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

सदर विहीर  चिलारीने वेढलेली असली तरी ती जीर्ण व अपुरी असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावरून दररोज वाहनचालक, प्रवासी, नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. याशिवाय श्री खंडोबा देवस्थानात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही सतत वर्दळ असते. त्यामुळे विहिरीच्या परिसरात कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात विहिरीचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विहिरीभोवती मजबूत संरक्षण कठडे उभारावेत व आवश्यक सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart