नारायण पवार यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.
सांगोल तालुका उदनवाडी येथील श्री. दादासाहेब जगताप विद्यालय उदनवाडी या प्रशालेतील सहशिक्षक नारायण पवार यांना मुंबई येथे १४ जून रोजी बी दी चेंज फाउंडेशन यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात केला.
यावेळी नारायण पवार यांचे शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले योगदान, सामाजिक बांधिलकी आणि आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन या पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार IAS सुमित रेवरी , डेप्युटी कमिशनर GST नंदकुमार दिघे,ACP रुक्मिणी गलांडे, अभिनेत्री निवेदिता पगार तसेच अमृत रोहोम , मयूर ढोकळे यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर ईतर मान्यवर उपस्थित होते.
नारायण पवार सर यांचे मूळ गाव वाटंबरे व ते शिक्षक म्हणून उदनवाडी या ठिकाणी कार्यरत आहेत. वाटंबरे ग्रामस्थ तसेच उदनवाडी प्रशालेतून व ग्रामस्थांमधून अभिनंदन केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा