Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, १४ जून, २०२६

वाटंबरे मान नदीपात्रातून विद्युत मोटरच्या केबलांची चोरी.

वाटंबरे मान नदीपात्रातून विद्युत मोटरच्या केबलांची चोरी.




महावितरण कंपनीचा अनियमित विद्युत पुरवठ्याने बेजार झालेल्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विद्युत पंपाच्या केबल चोरीमुळे मोठ्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे . बुद्धिहाळ तलावातील केबल चोरीची प्रकरण ताजे असताना वाटंबरे येथील मान नदीच्या पात्रातून पंधरा ते वीस शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपाच्या केबल चोरीची घटना घडली .
या केबल चोरीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे हाता तोंडाशी आलेली पिके पाणी अभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत महावितरण कंपनीचा अनियमित वीजपुरवठा व चोरट्यांच्या केबल चोरीमुळे या भागातील शेतकरी हतलब झालेला दिसून येत आहे तरी याप्रकरणी सांगोला पोलीस स्टेशन यांनी लक्ष घालून केबल चोराना अटक करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart