जि.प.आबानगर (वाटंबरे) शाळेत बालआनंद बाजार उत्साहात
वाटंबरे - मुलांना व्यवहार ज्ञान व्हावे म्हणून जि.प.प्रा.शाळा आबानगर (वाटंबरे) येथे बालआनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन माजी डेप्युटी सरपंच श्री.सुबराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच श्री.किरण पवार,श्री. संजय पवार, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री.सत्यप्रकाश पवार उपाध्यक्ष श्री.पांडुरंग पवार,श्री. दत्तात्रय चव्हाण गुरुजी,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक तसेच आबानगर परिसरातील महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्वांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.
बाजारात विकण्यासाठी मुलांनी परिसरात पिकलेला हिरवा भाजीपाला,वांगी,दोडका इ. आणले होते.त्याचबरोबर पाणीपुरी,इडली, गुलाबजामुन,मसाला पापड इत्यादी खाद्यपदार्थांचे ही स्टॉल लावले होते. बाजारात अनेक पालकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.अनेक मुले आपला माल विकण्यासाठी चढाओढ करत होते.अशा प्रकारचे कार्यक्रम व्यवहार ज्ञान वाढवण्यासाठी आवश्यक असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापिका व शिक्षिका यांनी प्रयत्न केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा