सांगोला तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिलीप घुले तर सचिवपदी आनंद दौंडे
सांगोला ; तालुका प्रतिनिधी
सांगोला तालुका पत्रकार संघाची नवीन पदाधिकारी निवडी संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत सांगोला तालुका पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षपदी दिलीप घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच नूतन सचिवपदी आनंद दौंडे, कार्याध्यक्षपदी डॉ.वैभव जांगळे, उपाध्यक्षपदी सचिन गायकवाड यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
सांगोला तालुका पत्रकार संघाची नवीन पदाधिकारी निवडी संदर्भात मावळते अध्यक्ष मनोज उकळे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला बैठक पार पडली. या बैठकीत सांगोला तालुका पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षपदी दिलीप घुले, नूतन सचिव पदी आनंद (छोटू) दौंडे, कार्याध्यक्षपदी डॉ.वैभव जांगळे, उपाध्यक्षपदी सचिन गायकवाड यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या. या बैठकीला पत्रकार मनोज उकळे, दत्तात्रय खंडागळे, संजय बाबर, अशोक बनसोडे, नवीद पठाण, किशोर म्हमाणे, सिद्धेश्वर गाडे आदी पत्रकार उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा