Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सोमवार, २६ जानेवारी, २०२६

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांबरोबर राहिल्यास विकासाच्या दृष्टीने सोयीस्कर: माजी आम. ॲड. शहाजीबापू पाटील

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांबरोबर राहिल्यास विकासाच्या दृष्टीने सोयीस्कर: माजी आम. ॲड. शहाजीबापू पाटील 


माजी आम. शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते कडलास जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शोभाताई खटकाळे व कडलास पंचायत समिती गणाच्या उमेदवार राणीताई पाटील यांच्या प्रचाराचा अकोला येथे सिद्धनाथ मंदिरामध्ये शुभारंभ 


*प्रचारासाठी संपर्क कार्यालयाचा शुभारंभ संपन्न



सांगोला /प्रतिनिधी: केंद्रात भाजपचे सरकार आहे तर राज्यात भाजप- शिवसेना-( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महायुतीचे सरकार सत्तेत आहे. गावचा, तालुक्याचा व जिल्ह्याचा कारभार चांगल्या पद्धतीने चालावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची निर्मिती झाली. स्थानिक पातळीवर विकासाच्या दृष्टिकोन समोर ठेवून कडलास जिल्हा परिषद गटातून शोभाताई बाबासाहेब खटकाळे व कडलास पंचायत समिती गणातून राणीताई सुरज पाटील हे सक्षम उमेदवार दिले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला ऐतिहासिक यश मिळाले. याच धर्तीवर  जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेच्या उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळावे  यादृष्टीने सर्वांनी आजपासून कामाला लागावे असे आवाहन करीत माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ सिद्धनाथ मंदिरामध्ये नारळ फोडून करण्यात आला. सिद्धनाथाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असून या निवडणुकीत या निवडणुकीत आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून उमेदवारांना या बहुमताने विजयी करावे असे आवाहन माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी अकोला येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यप्रसंगी केले. 


पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, 2014 मध्ये मी शिवसेनेत प्रवेश केला .त्यानंतर तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकार मध्ये आम्ही सामील झाल्यानंतर तालुक्यातील विकासाला मोठ्या प्रमाणात गती आली व तालुक्याचा चौफेर व सर्वांगीण विकास करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला. कोणत्याही निवडणुकीत सतेबरोबर राहिल्यास निश्चितपणे प्रगती व विकास साधता येतो. कडलास गटात व गणात दोन्ही उमेदवार शिवसेनेचे आहेत .सर्वांनी नगरपालिकेमध्ये ज्याप्रमाणे माझ्यावरती प्रेम केले त्याप्रमाणे या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही पुन्हा एकदा असेच प्रेम दाखवावे. तालुक्यातील भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी आजपासूनच सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन शहाजीबापू पाटील यांनी प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी केले. 

यावेळी युवानेते योगेशदादा खटकाळे म्हणाले, यापूर्वीच्या निवडणुकीत मी दुसऱ्या पक्षात होतो. सध्या मी माजी आम.शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करत असून कडलास जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या उमेदवार मातोश्री. शोभाताई खटकाळे व पंचायत समिती गणाच्या उमेदवार राणीताई पाटील यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. बापूंचा शब्द अंतिम मानून शिवसेनेमध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारे काम करेन असा ठाम विश्वास व्यक्त केला. 

यावेळी चेअरमन अनिल खटकाळे यांनी  सांगितले की, कडलास जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून उभारलेल्या उमेदवारांना गावातून चांगले मताधिक्य देण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी. भविष्यातील गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र राहिल्यास निश्चितपणे चांगले दिवस पाहायला मिळतील असे सांगत दोन्ही उमेदवारांना अधिकाधिक मताधिक्याने विजयी करण्याची विनंती केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. निवडणुकीच्या अनुषंगाने जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

प्रचाराच्या शुभारंभासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकभाऊ शिंदे,सरपंच धनश्री गव्हाणे, उपसरपंच महादेव शिंदे, उद्योगपती बाळासाहेब आसबे, युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील, उद्योगपती सौदागर केदार, विष्णुपंत केदार, उद्योगपती आनंद घोंगडे,उद्योगपती प्रशांत तेली, कडलास गावचे राहुल गायकवाड, पांडुरंग लिगाडे गुरुजी, तंटामुक्ती अध्यक्ष किसन शिंदे, सुरज पाटील, शशिकांत बुरले ,मोहन लाम, पांडुरंग आसबे, विक्रम शिंदे ,राम शिंदे, माजी चेअरमन महादेव शिंदे ,माजी उपसरपंच गणेश शिंदे, चेतन खटकाळे ,आनंदराव खटकाळे, समाधान खटकाळे, जगन्नाथ खटकाळे, संजय चंदनशिवे, तसेच श्रीमती कृष्णाबाई खटकाळे, सुवर्णा खटकाळे ,शारदा खटकाळे, सुनंदा खटकाळे ,अश्विनी आसबे, हिराबाई शिंदे, अनिता शिंदे, प्रणाली शिंदे ,बेबीताई आसबे, राजलक्ष्मी पाटील, राजाका केदार, सविता खटकाळे, सुरेखा केदार, वनिता केदार, आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart