Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, २५ जानेवारी, २०२६

योगेश दादा खटकाळे यांच्या पुढाकारातून कडलास येथील जिल्हा प्राथमिक शाळेच्या रस्त्याचे काम पूर्ण.

 योगेश दादा खटकाळे यांच्या पुढाकारातून कडलास येथील जिल्हा प्राथमिक शाळेच्या रस्त्याचे काम पूर्ण.




कडलास येथील जिल्हा प्राथमिक शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने शाळकरी मुले व पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या कडलास येथील युवकांनी योगेश दादा खटकाळे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेत संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या.

योगेश दादा खटकाळे यांच्या आदेशानुसार रस्त्याची दुरुस्ती करून देण्यात आली असून, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे शाळेत ये–जा करणाऱ्या लहान मुलांना व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामस्थांनी या तातडीच्या आणि प्रभावी कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.


माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या प्रश्नांवर त्वरित उपाय करण्याची जी परंपरा आहे, त्याच परंपरेनुसार हे काम पूर्ण करून देण्यात आले, असे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.

तसेच शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना–भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. शोभाताई बाबासाहेब खटकाळे यांना कडलास परिसरातून चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

जनतेच्या प्रश्नांवर फक्त आश्वासन न देता प्रत्यक्ष काम करून दाखवणारे नेतृत्व हीच महायुतीची खरी ताकद असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart