Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सोमवार, २६ जानेवारी, २०२६

प्रजासत्ताक दिनानिमित्त गरजू विद्यार्थिनींना सायकली भेट .

 प्रजासत्ताक दिनानिमित्त गरजू विद्यार्थिनींना सायकली भेट .



श्री दादासाहेब जगताप विद्यालय उदनवाडी या शाळेच्या  सन 1982 सालच्या इ.दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांकडून सामाजिक भान आणि शैक्षणिक जाण ठेवत आपण शिकून गेलेल्या शाळेतील हुशार, होतकरू आणि गरजू विद्यार्थिनींना स्वखर्चाने नवीन सायकलीं वाटपाचा कार्यक्रम तत्कालीन मुख्याध्यापक श्री शामराव शिंदे सर आणि सध्याचे मुख्याध्यापक श्री राजाराम वलेकर सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी 1982 च्या दहावी वर्गाचे श्री चांडोले बी.एस.,जवंजाळ बी.एन., पवार पी.पी.,सौ मंदाकिनी स्वामी, श्रीमती शकुंतला स्वामी, श्रीमती नंदा भजनावळे, श्री पाटील आर.एम., श्री वलेकर बाजीराव, श्री विजय गाडे सर, श्री जीवन कांबळे सर, शिवाजी मिसाळ, भागवत रुपनर,राहूल मोरे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक आवर्जून उपस्थित होते..


   शाळेने दिलेल्या ज्ञान-संस्कारांच्या उपकाराची थोडीशी उतराई आणि ग्रामीण भागातील मुलींच्या मनात शिक्षणाची उमेद निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या 15ऑगस्ट 2026रोजी आणखी सायकलींची भेट देणार असल्याचे सांगितले.तसेच आजपर्यंत या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा एक स्नेहमेळावा घेण्यात यावा असा विचार शामराव शिंदे सर यांनी बोलून दाखवला.या स्तुत्य उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक श्री राजाराम वलेकर सर यांनी दात्यांचे मनःपूर्वक आभार मानले....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart