Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, ९ मार्च, २०२५

संतोष देशमुख हत्याप्रकरणी सांगोला बंदला ग्रामीण भागामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद.

 संतोष देशमुख हत्याप्रकरणी सांगोला बंदला ग्रामीण भागामध्ये  उत्स्फूर्त प्रतिसाद.



वाटंबरे /प्रतिनिधी :बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ रविवार दि. ९ फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सांगोला बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला ग्रामीण भागातील गावातून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला . वाटंबरे, राजुरी ,चिनके, बलवडी, चोपडी ,मानेगाव, हातीद, पाचेगाव  ,कमलापुर, या गावातील व्यापरांनी आपले व्यवसाय बंद ठेवून या बंदला आपला पाठिंबा दर्शविला तसेच काही गावातुन  आठ ते अकरा पर्यंत बंद पाळण्यात आला. या बंदमुळे ग्रामीण भागातील गावातून शुकशुकाट जाणवत होता दवाखाना, मेडिकल, दुग्ध व्यवसाय सोडता सर्व दुकाने बंद दिसत  होती या बंदमुळे ग्रामीण भागातील व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेले दिसून येत होते तसेच ग्रामीण भागातील नागरिकांमधून संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना  लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी केली जात होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart