Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, ७ मार्च, २०२५

जागतिक महिला दिनानिमित्त वाटंबरे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.

 जागतिक महिला दिनानिमित्त वाटंबरे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन. 



वाटंबरे /प्रतिनिधी:

सांगोला तालुका वाटंबरे येथे शनिवारी दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सखी महिला ग्राम संघ, झेप फाउंडेशन सामाजिक संस्था पुणे शाखा सोलापूर  पंढरपूर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 


या शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे  रवींद्र आवताडे (बी एम एम  ) यांच्या हस्ते  होणार आहे तसेच या शिबिरास सरपंच नामदेव पवार ,उपसरपंच मोनिका निकम सर्व ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी वाटंबरे गावातील सर्व महिला बचत गट व इतर ग्रामस्थांनी या रक्तदान शिबिरास उपस्थित राहण्याचे आव्हान  सखी महिला ग्राम संघ, झेप फाउंडेशन सामाजिक संस्था पुणे शाखा सोलापूर, पंढरपूर ब्लड बँक पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart