Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

वाटंबरे ग्रामस्थांचा एसटीबस रोको आंदोलनाचा इशारा.

 वाटंबरे ग्रामस्थांचा एसटीबस रोको आंदोलनाचा  इशारा. 


वाटंबरे /, प्रतिनिधी:

 महाराष्ट्र शासन एसटी प्रवाशाची संख्या वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत परंतु या योजनेला तिलांजली देण्याचे  काम काही एसटी चालक करत आहेत सांगोला तालुक्यातील वाटंबरे हे ठिकाण जागृत खंडोबा देवस्थान साठी महाराष्ट्र कर्नाटक मध्ये प्रसिद्ध आहे खंडोबा देवस्थानच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांचे मंदियाळी चालू असते तसेच वर्षातून दोनदा या देवस्थानचे मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भाविक भक्त जमा होत असतात तसेच हे ठिकाण रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग  येत असल्याने वाटंबरे , निजामपूर, राजुरी ,अकोला, चिनके, य, मंगेवाडी, अजनाळे तसेच आजूबाजूच्या परिसरातील प्रवाशांना ,सांगली, कोल्हापूर, मिरज, पंढरपूर, सांगोला ,सोलापूर या ठिकाणी जाण्यासाठी  मोठ्या प्रमाणावर सोयीस्कर पडते तसेच या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँक, मोठ्या प्रमाणावर पतसंस्था , माध्यमिक शाळा, तसेच हॉटेल व्यवसाय  व्यवसायकांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याने  या ठिकाणी नागरिकांची येणे जाणे मोठ्या प्रमाणावर राहते .

परंतु या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच जलद गाड्यांना थांबा दिला असताना या गाड्या वाऱ्याशी स्पर्धा करत प्रवासी न घेता निघून जात आहेत.  वाटंबरे गावचे महादेव पवार यांनी राज्य परिवहन मंडळ महाव्यवस्थापक मुंबई, राज्य परिवहन महामंडळ सोलापूर, व सांगोला आगाराशी वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रार करून देखील या तक्रारीला एसटी चालक  केराची टोपली दाखवण्याचे काम करत आहेत या ठिकाणी जलद गाड्यांचा थांबा असताना गाड्या थांबत नसल्यामुळे वाटंबरे व आजूबाजूच्या गावातील प्रवाशांना सांगोला या ठिकाणी जाऊन परत आपल्या गावाकडे यावे लागत आहे त्यामुळे  रात्री मोठ्या प्रमाणावर महिलांना वयोवृद्ध नागरिकांना याचा त्रास होत आहे तरी लवकरात लवकर राज्य परिवहन महामंडळाने याचा निर्णय नाही घेतल्यास वाटंबरे ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या परिसरातील प्रवासी एसटी रोको आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत अशा आशयाचे निवेदन सांगोला एसटी आगर तहसीलदार सांगोला पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे. 


चौकट:

 


महादेव पवार 

वाटंबरे या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व गाड्यांना थांबा असताना या मार्गावरून जाणाऱ्या जलद गाड्या एकही प्रवासी न घेता निघून जातात  चालक वाहकाला माहिती विचारली असता वाटंबरेला थांबा नाही असे त्यांच्याकडून सांगितले जाते त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गैरसोय होत आहे याची तक्रार आम्ही राज्य परिवहन मंडळ महा व्यवस्थापक मुंबई, राज्य परिवहन महामंडळ सोलापूर व सांगोला आगाराशी वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार देऊन देखील याची दखल घेतली जात नाही  तरी आम्ही वाटंबरे ग्रामस्थ व आजूबाजूच्या गावातील प्रवासी एसटी रोको आंदोलन करणार आहे तसे निवेदन सांगोला आगार, सांगोला पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय येथे देण्यात आले आहे. 

                   महादेव पवार.


 

No comments