Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

आ. बाबासाहेब देशमुख व आ. दीपक आबा साळुंखे यांची विजय पवार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट.

 आ. बाबासाहेब देशमुख व आ. दीपक आबा साळुंखे यांची विजय पवार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट.




वाटंबरे /प्रतिनिधी: 

सांगोला तालुका वाटंबरे येथील आ.दीपक आबा साळुंखे पाटील यांचे खंदे समर्थक तालुका नियोजन समितीचे सदस्य वाटंबरे गावचे  तंटामुक्ती अध्यक्ष विजय पांडुरंग पवार यांच्या मातोश्री कै. पार्वती पांडुरंग पवार यांचे सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. सांगोला तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख व दीपक आबा साळुंखे पाटील यांनी विजय पवार यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना धीर देत त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले .

यावेळी विजय पवार बंधु संजय पवार यांचा मित्रपरिवार ,नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

No comments