अस्थीचे विसर्जन न करता स्मशानभूमीत वृक्षारोपण करत वडीलांना वाहीली श्रद्धांजली.
अस्थीचे विसर्जन न करता स्मशानभूमीत वृक्षारोपण करत वडीलांना वाहिली श्रद्धांजली.
वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला तालुका वाटंबरे येथील वारकरी संप्रदायात कार्यरत असणारे कै.आप्पासो पवार यांचे शनिवारी दि. ६ एप्रिल रोजी वृद्धपकाळाने वयाच्या 80 वर्षी दुःखद निधन झाले होते मंगळवार दि. ८ एप्रील रोजी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम झाला . हिंदू धर्मामध्ये मनुष्य मरण पावल्यानंतर त्याच्या अस्थी नदीत सोडण्याची परंपरा आहे परंतु वाटंबरे येथील त्यांची मुले डॉक्टर उत्तम पवार व बंधू बापुसो पवार व त्यांच्या कुटुंबानी या गोष्टीला बगल देत आपल्या वडिलांच्या अस्थी चे विसर्जन न करता त्यानी स्मशानभूमी मध्ये त्या अस्थी वरती वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करत सर्वांसमोर एक आदर्श निर्माण करून दिला.
या वेळी यशराज साळुंखे पाटील, डॉक्टर उत्तम पवार यांचे बंधू तसेच सर्व नातेवाईक ,वारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.




No comments