Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

६४ वर्षीय बेवारस इसमाचा सोलापूर ग्रामीण रुग्णालयात मृत्यू.

 ६४ वर्षीय बेवारस इसमाचा सोलापूर ग्रामीण रुग्णालयात  मृत्यू. 



वाटंबरे /प्रतिनिधी:

सांगोला तालुका चिणके  वझरे रोड वरती  31 ऑक्टोबर रोजी  ६४ वर्षे वयोगटातील इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. अज्ञात इसमाने उपचारासाठी  ॲम्बुलन्स करता  १०८ नंबर वरती फोन करून त्यास सांगोला येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये उपचारासाठी  दाखल केले.परंतु

त्यास पुढील उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले 

होते परंतु उपचारादरम्यान  सदर इसम मयत झाल्याने त्या अनोळखी इसमाची ओळख पटलेली नाही . सदर व्यक्तीची उंची पाच फूट, रंग काळा बांधा सड पातळ असा असलेला असून सदर प्रेतास काळी पांढरी दाढी व डोक्यावर पांढरे केस असलेली दिसत आहेत.

तरी हा व्यक्ती कोणाचा नातेवाईक, मित्र, ओळखीचा असल्यास  त्यांनी सांगोला पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आव्हान  पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांनी केले आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे, पोलीस नाईक सुजित जाधव करत आहेत.

No comments