Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी तर्फे रविराज शेटे यांचा सत्कार*

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी तर्फे रविराज शेटे यांचा सत्कार*

नाझरे प्रतिनिधी 
     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी ता. सांगोला वतीने सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्षपदी रवीराज शेटे यांची निवड झाल्याने त्यांचा शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब खुळपे, उपाध्यक्ष चांगदेव तात्या शिंदे, मुख्याध्यापक मनोहर पवार, सरपंच माऊली राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 
       सदर प्रसंगी सरपंच ज्ञानेश्वर राऊत, माजी उपसरपंच समाधान शिंदे, मुख्याध्यापक मनोहर पवार यांनी शेटे सरांच्या कार्याचा आढावा सांगितला. तसेच सत्कारमूर्ती रविराज शेटे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेश गुरव, शिवाजी शिंदे, दिगंबर धायगुडे गुरुजी, वसंत राऊत, शिक्षक विजयकुमार शिंदे, सागर गुरव, रणजीत शिंदे, शिक्षिका स्वाती पाटील, सोनल सावंत, योगिता शांत, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी शिक्षक गोरख बनसोडे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart